Homeउद्योगदौंड तालुक्यातील पारगाव मध्ये गोडावून अगीच्या भस्मस्थानी... लाखोंचे नुकसान..

दौंड तालुक्यातील पारगाव मध्ये गोडावून अगीच्या भस्मस्थानी… लाखोंचे नुकसान..

संघर्ष नायक वृत्तसेवा पारगाव (ता.२६)

पारगाव (ता. दौंड) : येथील खंडोबा नगर परिसरात गणराज एंटरप्राइजेसच्या गोडाऊनला काल मध्यरात्री भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून वेळेत खबरदारी घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, पारगाव चौकात गणराज एंटरप्राइजेस नावाने इलेक्ट्रिक, स्टेशनरी, भांडी व हंगामी वस्तूंचे मोठे दुकान चालवणारे नवनाथ रसाळ यांच्या घरालगत तिन्ही बाजूंनी गोडाऊन होते. काल रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास गोडाऊनला आग लागल्याचे लक्षात येताच रसाळ यांनी तत्काळ घरातील सर्व सदस्यांना बाहेर काढले. त्यामुळे संभाव्य जीवितहानी टळली.
गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व सजावटीच्या वस्तू असल्याने आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. धुराचे प्रचंड लोट व ज्वाळा दूरवरून दिसत होत्या. आग आटोक्यात आणण्यासाठी दौंड, कुरकुंभ आणि वाघोली येथून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पहाटे साडेपाच वाजेपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते.
या आगीत गोडाऊनमधील सर्व साहित्य जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
नवनाथ रसाळ यांनी टेलरिंग व्यवसायातून सुरुवात करून अल्पावधीत उभा केलेला हा व्यवसाय या घटनेमुळे मोठ्या संकटात सापडला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांच्या संख्याबळावर, तर भाजपने पुणे एमएलसी जागेवर दावा ठोकण्याच्या अलीकडच्या हालचालींवर

माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष सुनील टिंगरे रविवारी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते पुणे: जिल्हाभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाचे सर्वाधिक सदस्य...

सार्वजनिक रस्त्यावर केक कापल्याप्रकरणी पुण्याच्या माजी नगरसेवकासह सहा जणांवर गुन्हा दाखल

पुणे : सार्वजनिक रस्त्यावर टेबल ठेवून आणि केक कापून वाढदिवस साजरा करणे येरवड्यातील गाडीतळ येथील एका माजी नगरसेवकाला शुक्रवारी पहाटे एकच्या सुमारास...

हिंजवडी पूर्व पावसाळ्याच्या कामांसाठी पीएमआरडीएच्या प्रमुखांनी ३१ मेची मुदत दिली, त्रुटी आढळल्यास कारवाईचा इशारा

हिंजवडी परिसरात पावसाळापूर्व कामांचा एक भाग म्हणून स्ट्रॉम वॉटर नाले आणि नैसर्गिक नाले साफ करण्याचे काम पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने...

कचरा वेचक युनियनला PMC आरोग्य योजनेत नागरी कर्मचाऱ्यांचा समावेश हवा आहे | पुणे बातम्या

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) त्यांच्या कामगारांना लाइफ कव्हर द्यावे आणि नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी...

ग्राहक उपाय विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

error: Content is protected !!