संघर्ष नायक वृत्तसेवा यवत (ता.११)
यवत पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणावर गावठी अवैध दारूभट्टी सुरु असल्याची माहिती नागरिक देत आहेत. यां दारूभट्टीचा त्रास येथील शेतकरी आणि नागरिक महिलांना मोठ्या प्रमाणावर होत आहे.यां दारुभट्टी वर मोठ्या प्रमाणावर गूळ आणि इतर विषारी पदार्थ यांचे रसायन भिजत घातले असून त्याठिकाणी रोज दारू निर्मिती केली जात आहे.
याठिकाणी तयार झालेली दारू ही पुणे आणि परिसरातील छोट्यामोठ्या दारुविक्री केंद्रावर विकली जात आहे. यां दारुभट्टी वरून पिकअप गाडीतून ही दारू पोहचवली जात असल्याची चर्चा येथील नागरिक करत आहे. याठिकाणी लोकवस्ती पासून काही अंतरावरच ही दारू भट्टी असल्याने याठिकाणी दिवसा आणि रात्रभर दारू निर्मिती केली जात असताना सुधा पोलिसांना याची माहिती कशी नाही? का जाणीवपूर्वक यां दारुभट्टी साठी अभय दिले जात आहे अशी शंका नागरिक उपस्थित करू लागले आहेत.
दारुभट्टी चालवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई कारवाई अशी मागणी त्याठिकाणी नागरिक करू लागले आहेत. यां भट्टीचालकाची अनेक अवैध धंदे वाल्यांशी संबंध असल्याचा आरोप देखील नागरिक आकरत आहे. त्यामुळे त्याच्या दहशतीला घाबरून कोणीही शेतकरी नागरिक एवढा त्रास होऊन देखील तक्रार करण्यास पुढे देत नसल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. यावर यवत पोलीस कारवाई करणार का असा सवाल आता पुढे येऊ लागला आहे.
तो अधिकारी कोण? यवत पोलीस ठाणे हद्दीत एवढी मोठी दारुभट्टी सुरु असून त्या ठिकाणी असणारा तो पोलीस अधिकारी कोण आहे जो यां दारूभट्टीला अभय देत असून भट्टीवला आणि पोलीस यांच्यात अर्थपूर्ण मैत्री असल्याचा आरोप देखील येथील नागरिक करत आहेत.पोलीस कर्मचारी कारवाई करण्यासाठी जरी गेले तरी तो पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यावर दबाव देत असल्याची चर्चा देखील नागरिक आणि पोलीस वर्तुळात सुरु आहे.त्यामुळे तो अधिकारी कोण आहे? असा देखील संतप्त सवाल नागरिकांतून विचारू लागले आहेत.

मुख्य संपादक:
























