Homeताज्या बातम्याकर्जमाफीची घोषणा मोठी,पण अटी व नियमांमुळे बहुतांश शेतकरी वंचित ?

कर्जमाफीची घोषणा मोठी,पण अटी व नियमांमुळे बहुतांश शेतकरी वंचित ?

पारगाव संघर्ष नायक वृत्तसेवा ता. ०५                           राज्यात महायुती सरकारने ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना” जाहीर केली असली, तरी तिच्यातील अटी व नियमांमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

शासनाच्या निकषांनुसार, ज्या शेतकऱ्यांना २०१९ मधील कर्जमाफीचा लाभ मिळाला होता, त्यांना यावेळी केवळ ५० हजार रुपयांपर्यंतच लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे पीक कर्ज अथवा इतर कर्जाचे ओझे असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेतून अपेक्षित दिलासा मिळणार नसल्याची भावना व्यक्त होत आहे.
राज्यातील सुमारे ७० ते ८० टक्के कर्जबाजारी शेतकरी २०१९ च्या कर्जमाफीचे लाभार्थी असल्याचे सांगितले जात आहे. परिणामी, या मोठ्या वर्गाला फक्त ५० हजार रुपयांचीच मदत मिळणार असून उर्वरित थकबाकीची परतफेड स्वतः करावी लागणार आहे.
यामुळे “कर्जमाफीचा खरा लाभ नेमका कोणाला मिळणार?” असा सवाल आता शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि त्याचा शेतकऱ्यांवरील परिणाम याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सातबारा कोरा करण्याची घोषणा करून शासनाने शेतकऱ्यांची ही पूर्ण दिशाभूल केली आहे. हे म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढणे असे झाले आहे.या कर्जमाफी योजने मुळे शेतकरी समाधानी नसून राज्य सरकारने फेरवीचार करून पूर्ण कर्जमाफी करावी.
–  भानुदास शिंदे (राज्य प्रवक्ते रयत क्रांती शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य )

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शालेय अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडछाड प्रकरणी दोन युवकांवर पोस्को अंतर्गत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल….न्यायालयीन...

पारगाव,संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.२९) शिक्षणासाठी घराबाहेर पडणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना पारगाव परिसरात घडली आहे.पारगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते

पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या (झेडपी) इमारतीत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्या पदाधिकाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने मोठे नाट्य...

भारतीय शास्त्रज्ञांना मलेरिया थांबवण्याचा मार्ग सापडला असेल

नवी दिल्लीतील रस्त्यावर साचलेले पाणी. भारतामध्ये 2015 पासून मलेरियाच्या प्रकरणांमध्ये अंदाजे 80-87% घट नोंदवली गेली आहे. लडाख, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीसह अनेक प्रदेशांमध्ये अलीकडच्या...

पाऊस आणण्यासाठी सक्रिय मान्सून, सोसाट्याचा वारा महा | पुणे बातम्या

रविवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24 तासांत कुरवंडे येथे सर्वाधिक 123 मिमी, लव्हाळे येथे 60 मिमी आणि भोर येथे 50 मिमी पावसाची नोंद...

error: Content is protected !!