Homeताज्या बातम्याश्री संतराज महाराज पालखीचे भक्तिमय वातावरणात प्रस्थान, हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी.

श्री संतराज महाराज पालखीचे भक्तिमय वातावरणात प्रस्थान, हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी.

संघर्ष नायक वृत्तसेवा पारगाव ता. ११

श्री क्षेत्र संगम वाळकी (ता. दौंड) येथील श्री संतराज महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आषाढी वारीसाठी शनिवारी (दि. ११) दुपारी १ वाजता भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. विठ्ठल नामाच्या अखंड गजरात हजारो वारकरी पालखीसोबत पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले. कोंडे वस्ती या ठिकाणी वारकऱ्यांना खिचडी फराळाचे वाटप करण्यात आले.
त्यानंतर पालखी मुक्कामासाठी एकेरीवाडीकडे रवाना झाली. यंदा नानगाव येथील सुभाष इंदलकर यांच्या ‘सर्जा-राजा’ बैलजोडीला तसेच पारगाव येथील मंदोदरी ताकवणे यांच्या ‘हिरा-पोपट ‘ बैलजोडीला पालखीचा रथ ओढण्याचा मान मिळाला. बाळासाहेब शितोळे यांची नगाऱ्याची गाडी, मानाचा ‘हिरा’ अश्व आणि त्यामागे श्री. संतराज महाराजांची पालखी असा भव्य सोहळा भीमा नदीच्या पुलावरून जात असताना हेलिकॉप्टर मधून होणारी पुष्पवृष्टी भाविकांनी मोबाईल कॅमेऱ्यांत कैद केली .
यंदा पालखी सोहळ्याचे ५९ वे वर्ष असून तालुक्यासह बाहेरील सुमारे १० हजार भाविकांनी उपस्थिती लावली. यावेळी आमदार राहुल कुल, शांतीनाथ महाराज, उद्योगपती विकास ताकवणे,जिल्हा परिषद सदस्य सागर शेलार, माऊली ताकवणे,यांनी मनोगते व्यक्त केली
या प्रसंगी माजी आमदार रमेश थोरत, सयाजी ताकवणे, सर्जेराव जेधे, तुकाराम ताकवणे, चंद्रकांत नातू, रामभाऊ टुले, उत्तमराव ताकवले , यांच्यासह ट्रस्टचे विश्वस्त, पंचक्रोशीतील मान्यवर आणि हजारो भाविक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतराज महाराज पवार ट्रस्ट चे अध्यक्ष ह. भ. प. नामदेव महाराज साठे यांनी केले तर उपाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी पारगावचे माजी सरपंच सर्जेराव जेधे यांनी मंदिराच्या सुशोभीकरणासाठी ५ लाख रु. वर्गणी जाहीर केली.

 हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी पालखी प्रस्थानावेळी देलवडी येथील उद्योजक पोपटराव शेलार, चतुराबाई शेलार, माजी आमदार रंजना कुल, सिद्ध सद्गुरू शांतीनाथ महाराज यांच्या हस्ते पालखी सोहळ्यावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. या अनोख्या स्वागताने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

BIG BREKING NEWS गर्भलिंग निदान प्रकरणात SIT ची मोठी कारवाई ; मुख्य आरोपी आण्णा...

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (ता.०९) केडगाव ता. दौंड येथील बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणात यवत पोलीस ठाण्याच्या विशेष तपास पथकाने (SIT) तपासाची व्याप्ती वाढवत मोठी कारवाई...

‘मावशी, साप आला!’ म्हणत वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने हिसकावले यवत पोलिसांनी सराईत आरोपीला जेरबंद...

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८) शेतात काम करून झाडाजवळ बसलेल्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेला ‘मावशी, साप आला!’ असे सांगून घाबरवून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने...

यवत–भांडगाव–खुंटबाव परिसरात मटका व्यवसायाला ऊत; कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

दौंड संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८) यवत, भांडगाव आणि खुंटबाव परिसरात मटका व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. परिसरातील विविध ठिकाणी...

बोरीएंदीच्या निखिल दीक्षितची AI मध्ये भरारी

यवत संघर्ष नायक प्रतिनिधी दि . ३०  दौंड तालुक्यातील बोरीएंदी येथील सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या निखिल देविदास दीक्षित यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत फिल्म मेकिंग,...

खासदार सुप्रिया सुळे यांची पिंपळगाव येथील गिरीष ऍग्रो फूड्सला भेट….नातू बंधुचे केले कौतुक…

संघर्षनायक पारगाव (दि.३०)  खासदार सुप्रिया सुळे यांनी (दि.३०) रोजी दौंड तालुक्याच्या दौऱ्यात विविध ठिकाणी भेटी देत नागरिक, कार्यकर्ते व विविध संस्थांशी संवाद साधला. ‘आपला मतदारसंघ,...

error: Content is protected !!