Homeआरोग्यअवैध गावठी हातभट्टी व्यवसायासाठी अभय कोणाचे? पोलीस अधीक्षक यांनी लक्ष घालून कारवाई...

अवैध गावठी हातभट्टी व्यवसायासाठी अभय कोणाचे? पोलीस अधीक्षक यांनी लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी…

संघर्ष नायक वृत्तसेवा यवत (ता.०९)

दौंड तालुक्याच्या यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत उसाच्या शेताच्या भागात विषारी हातभट्टी दारूची मोठी भट्टी सुरू आहे. हा दारुभट्टी चा व्यवसाय मोठ्या जोमात चालू आहे.या विषारी हातभट्टी दारूमुळे अनेकजण व्यसनाच्या आहारी गेले असून काहींचे तर प्रपंच तर उघड्यावर आले असून यामुळे कौटुंबिक वादविवाद देखील वाढले आहेत.अनेकांचे दारूमुळे संसार उद्ध्वस्त झाले असल्याचे दिसून येत आहे.

या अवैध दारूच्या भट्ट्यावर किरकोळ कारवाई केली जाते, तर या पकडलेल्या किती दारू विक्रेत्यांवर कोणत्या विभागात गुन्हे दाखल होतात.हा मात्र मोठा संशोधनाचा विषय आहे.अनेकवेळा महिन्यातून एकदा यवत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी खासगी गाडी घेऊन येतात आणि दारू विक्री करणाऱ्यांना पकडतात मात्र दारूच्या भट्ट्या उध्वस्त करायला ते धजावत नसल्याचे बोलले जात आहे.यामुळे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्या कार्यक्षमतेवर नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले आहेत.दारू विक्री करणाऱ्याकडून  हजार रुपयांपासून दहा हजार रुपयांपर्यंत रोख रक्कम व दारू भट्टी चालवणाऱ्याकडून एक लाख ते दीड लाख रुपयांपर्यंतची रोख रक्कम घेऊन त्यांना त्याच ठिकाणी सोडून देत असल्याची चर्चा देखील नागरिक राजरोसपने करत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या वरदहस्तानेच ही अवैध हातभट्टी दारू निर्मिती यांच्याच आशीर्वादाने जोमात सुरू असल्याचे बोलले जात असून नागरिकांतून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

या दारुभट्टीचा त्रास महिला, शेतकरी,सर्वसामान्य नागरिक यांना होत आहे.याकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.ही हातभट्टी दारू युरिया काही रासायनिक व केमिकल वापरून तयार केलेली जाते. त्यातच खराब गूळ, इतर रासायनिक केमिकल यामुळे या दारूचा उग्र वास येत असतो.तसेच ही दारू कसल्याही भांड्यात,बाटल्यात, डब्यात, ड्रम, काळ्या रंगाच्या मोठया कॅन व ट्यूबमध्ये भरली जाते.यामुळे ही दारू आणखीच विषारी झाली आहे.ही हातभट्टी दारू ओढ्यालगत,दाट झाडी, खासगी शेतकऱ्यांच्या जागा भाड्याने घेऊन त्यांना जादा भाड्याचे आमिष दाखवून यामध्ये राजरोसपणे अवैध दारुभट्टीचे उत्पादन केली जाते.ही तयार झालेली गावठी हातभट्टी पिकअप मधून दुसऱ्या ठिकाणी विक्रीसाठी नेत असून याबाबत मात्र पोलीस प्रशासनाचे लक्ष नाही का? का जाणीवपूर्वक अर्थपूर्ण पोलीस अधिकारी आणि कर्मचारी याकडे दुर्लक्ष करतात असा देखील सवाल यानिमित्त पुढे येऊ लागला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कारवाईची मागणी…
यवत पोलीस ठाणे हद्दीत गावठी हातभट्टीचा हा मोठा व्यवसाय येथील स्थानिक नागरिक पोलिसाना हाताशी धरून करत असल्याची माहिती समोर येत आहे. या भट्टीच्या माध्यमातून पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना अवैधपणे अनधिकृत मोठा महसूल त्यांना स्वतःच्या गरजा भगवण्यासाठी मिळत असल्याची चर्चा आहे.यामध्ये पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी लक्ष घालून यावर कारवाई करावी अशी मागणी येथील शेतकरी आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर करू लागले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शालेय अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडछाड प्रकरणी दोन युवकांवर पोस्को अंतर्गत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल….न्यायालयीन...

पारगाव,संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.२९) शिक्षणासाठी घराबाहेर पडणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना पारगाव परिसरात घडली आहे.पारगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते

पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या (झेडपी) इमारतीत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्या पदाधिकाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने मोठे नाट्य...

भारतीय शास्त्रज्ञांना मलेरिया थांबवण्याचा मार्ग सापडला असेल

नवी दिल्लीतील रस्त्यावर साचलेले पाणी. भारतामध्ये 2015 पासून मलेरियाच्या प्रकरणांमध्ये अंदाजे 80-87% घट नोंदवली गेली आहे. लडाख, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीसह अनेक प्रदेशांमध्ये अलीकडच्या...

पाऊस आणण्यासाठी सक्रिय मान्सून, सोसाट्याचा वारा महा | पुणे बातम्या

रविवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24 तासांत कुरवंडे येथे सर्वाधिक 123 मिमी, लव्हाळे येथे 60 मिमी आणि भोर येथे 50 मिमी पावसाची नोंद...

error: Content is protected !!