Homeक्राईमउदाचीवाडी येथे गोळीबार , सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

उदाचीवाडी येथे गोळीबार , सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सासवड संघर्ष नायक वृत्तसेवा ता.०६

सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या उदाचीवाडी (ता. पुरंदर) येथे आज पहाटे घराबाहेर येऊन गावठी कट्ट्याने गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील फिर्यादी विकी मुरली राजपूत (वय ३०, रा. उदाचीवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे) हा पूर्वी वाकड व चाकण परिसरात राहून भोसे-चाकण येथे वडापावचा व्यवसाय करीत होता. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून तो आपल्या आई उषा मुरली राजपूत यांच्या सोबत उदाचीवाडी येथे राहण्यास आलेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकी राजपूत याचा वाकड व चाकण येथील जागेवरून त्याचा मावसभाऊ पृथ्वीराज उत्तरसिंग राठोड व काका उत्तरसिंग रामकुमार राठोड (दोघेही रा. भोसे, चाकण, ता. खेड, जि. पुणे) यांच्याशी दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. याच वादातून सदर घटनेला तोंड फुटल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

आज पहाटे अंदाजे ५.३० ते ६.०० वाजण्याच्या सुमारास पृथ्वीराज राठोड व उत्तरसिंग राठोड हे दोन्ही आरोपी विकी राजपूत याच्या उदाचीवाडी येथील घराबाहेर आले. यावेळी त्यांनी गावठी कट्ट्याने घराच्या दिशेने गोळीबार केला. या घटनेत दोन राउंड फायर झाल्याचे निष्पन्न झाले आहे.सुदैवाने या गोळीबारात कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची घटना घडलेली नाही. मात्र पहाटेच्या सुमारास झालेल्या या फायरिंगमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

माहिती मिळताच सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. घटनास्थळावरून गोळीबाराचे पुरावे गोळा करण्यात आले असून आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली.

या घटनेमुळे ग्रामीण भागात बेकायदेशीर शस्त्रांचा वाढता वापर आणि कौटुंबिक वादातून हिंसक प्रकार घडत असल्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. सासवड पोलीस पुढील तपास करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शालेय अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडछाड प्रकरणी दोन युवकांवर पोस्को अंतर्गत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल….न्यायालयीन...

पारगाव,संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.२९) शिक्षणासाठी घराबाहेर पडणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना पारगाव परिसरात घडली आहे.पारगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते

पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या (झेडपी) इमारतीत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्या पदाधिकाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने मोठे नाट्य...

भारतीय शास्त्रज्ञांना मलेरिया थांबवण्याचा मार्ग सापडला असेल

नवी दिल्लीतील रस्त्यावर साचलेले पाणी. भारतामध्ये 2015 पासून मलेरियाच्या प्रकरणांमध्ये अंदाजे 80-87% घट नोंदवली गेली आहे. लडाख, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीसह अनेक प्रदेशांमध्ये अलीकडच्या...

पाऊस आणण्यासाठी सक्रिय मान्सून, सोसाट्याचा वारा महा | पुणे बातम्या

रविवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24 तासांत कुरवंडे येथे सर्वाधिक 123 मिमी, लव्हाळे येथे 60 मिमी आणि भोर येथे 50 मिमी पावसाची नोंद...

error: Content is protected !!