Homeताज्या बातम्यापांडवकालीन शंभु महादेव मंदिराची दुरावस्था ;भाविकात नाराजी..

पांडवकालीन शंभु महादेव मंदिराची दुरावस्था ;भाविकात नाराजी..

संघर्ष नायक वृत्तसेवा पारगाव (ता. २८) 

दौंड तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचे स्थान असलेल्या पारगाव गावातील पांडवकालीन श्री शंभु महादेव मंदिर आज अक्षरशः मृत्यूच्या उंबरठ्यावर उभे आहे. एकेकाळी श्रद्धेचे केंद्र असलेले हे प्राचीन मंदिर आता भग्नावस्थेत ढासळत असून, त्याचे उरलेसुरले अवशेषही अखेरची घटका मोजत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.

मंदिराच्या शिखराची मोठ्या प्रमाणावर पडझड झाल्याने संपूर्ण रचना आता मात्र धोकादायक बनली आहे. कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही प्रशासन आणि संबंधित यंत्रणा मात्र अद्यापही ‘झोपेत’ असल्याचे चित्र आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी बैठका, चर्चा, आश्वासने आणि देणग्यांच्या घोषणा होत आल्या; मात्र प्रत्यक्षात एकही वीट रचली गेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सुरु उमटत आहे.
सुमारे १५ हजार लोकसंख्या असलेल्या पारगावसारख्या मोठ्या गावात इतक्या ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाची अशी दुर्दशा होणे ही गावासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब मानली जात आहे. विशेष म्हणजे दौंड तालुक्यातील इतर शंभु महादेव मंदिरांच्या तुलनेत पारगावचे मंदिर सर्वाधिक भग्नावस्थेत असल्याचे स्थानिकांचे ठाम मत आहे.
या पार्श्वभूमीवर शंभूभक्तांच्या मताचा आदर करून योग्य ती भूमिका घेत तात्काळ पुनर्बांधणी सुरू करण्याची जोरदार मागणी होत आहे. गावाच्या अस्मितेचा प्रश्न बनलेल्या या मंदिराच्या जतनासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी, विश्वस्त आणि ग्रामस्थ यांनी तातडीने एकत्र येऊन ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे.
अन्यथा, इतिहासाच्या पानांवरून पारगावचे हे श्रद्धास्थान कायमचे पुसले जाण्याची भीती भाविकांच्यातून व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांच्या संख्याबळावर, तर भाजपने पुणे एमएलसी जागेवर दावा ठोकण्याच्या अलीकडच्या हालचालींवर

माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष सुनील टिंगरे रविवारी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते पुणे: जिल्हाभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाचे सर्वाधिक सदस्य...

सार्वजनिक रस्त्यावर केक कापल्याप्रकरणी पुण्याच्या माजी नगरसेवकासह सहा जणांवर गुन्हा दाखल

पुणे : सार्वजनिक रस्त्यावर टेबल ठेवून आणि केक कापून वाढदिवस साजरा करणे येरवड्यातील गाडीतळ येथील एका माजी नगरसेवकाला शुक्रवारी पहाटे एकच्या सुमारास...

हिंजवडी पूर्व पावसाळ्याच्या कामांसाठी पीएमआरडीएच्या प्रमुखांनी ३१ मेची मुदत दिली, त्रुटी आढळल्यास कारवाईचा इशारा

हिंजवडी परिसरात पावसाळापूर्व कामांचा एक भाग म्हणून स्ट्रॉम वॉटर नाले आणि नैसर्गिक नाले साफ करण्याचे काम पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने...

कचरा वेचक युनियनला PMC आरोग्य योजनेत नागरी कर्मचाऱ्यांचा समावेश हवा आहे | पुणे बातम्या

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) त्यांच्या कामगारांना लाइफ कव्हर द्यावे आणि नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी...

ग्राहक उपाय विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

error: Content is protected !!