जुगार सुरू ठेवण्यासाठी कुणाचे अभय गावात उलटसुलट चर्चेला उधाण….
यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.३०)
खुटबाव परिसरात काटेरी झुडपांच्या आडोशाला जुगाराचा अड्डा सुरू असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून नागरिकांमध्ये रंगली आहे.या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैशांची उलाढाल होत असल्याचा आरोपही स्थानिकांकडून केला जात आहे.याची काल बातमी प्रसिद्ध होऊनही त्यावर या प्रकाराची पोलिस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे, गावात जुगाराचा प्रकार सुरू असल्याची माहिती स्थानिक पातळीवर चर्चेत असतानाही संबंधित ठिकाणी पोलिसांची कारवाई का होत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जुगार अड्डा नेमका कोण चालवतो? त्यामागे कोणाचा आर्थिक किंवा राजकीय वरदहस्त आहे का? तसेच हा प्रकार सुरू ठेवण्यासाठी कोणाचे अभय मिळत आहे का, याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.
कारवाई न झाल्याने नागरिकांच्यात उलट सुलट चर्चा….
स्थानिक पातळीवर पोलिस यंत्रनेणे अजूनही कारवाई न केल्याने त्याबाबत नागरिकांच्यात उलट सुलट चर्चा सुरु असून यावर कारवाई होणार का असा संतप्त सवाल नागरिकांच्यातून उपस्थित केला जात आहे.
कारवाई होते की केवळ…..
जुगारामुळे आर्थिक नुकसान, कौटुंबिक वाद तसेच गावातील सामाजिक वातावरणावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.त्यामुळे केवळ तोंडी चर्चांवर न थांबता संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून जुगार चालवण्यावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.खुटबावमधील कथित जुगार अड्ड्याबाबत पोलिस प्रशासनाकडे माहिती आहे का? असल्यास आतापर्यंत कोणती कारवाई करण्यात आली? पुढील काळात कारवाई होणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची सत्यता तपासून कारवाईबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी,अशी मागणी नागरिकांच्यातून जोर धरत आहे.

मुख्य संपादक:





















