Homeमहत्त्वाचेबीबीसी मराठीचे संपादक अभिजित कांबळे यांच्या हस्ते पत्रकार सुमित सोनवणे यांचा सन्मान,...

बीबीसी मराठीचे संपादक अभिजित कांबळे यांच्या हस्ते पत्रकार सुमित सोनवणे यांचा सन्मान, महात्मा फुले यांचे वाङ्मय प्रदान..

दौंड संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०५)

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त संयुक्त महाराष्ट्र पत्रकार महासंघ, मुंबई यांच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी गेल्या दहा वर्षांपासून ग्रामीण तसेच शहरी भागातील विविध सामाजिक प्रश्नांना आपल्या निर्भीड आणि परखड पत्रकारितेतून वाचा फोडणारे दौंड येथील पत्रकार सुमित सोनवणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

संयुक्त महाराष्ट्र पत्रकार महासंघाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२६ चा पारितोषिक वितरण सोहळा रविवार, दि. ४ रोजी पुणे, कोथरूड येथील गांधी भवन येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ‘शिक्षण व्यवस्थेची परीक्षा आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य’ या विषयावर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात बीबीसी मराठीचे संपादक अभिजित कांबळे, ‘द वायर’चे पत्रकार मोहम्मद इरफान आणि राज्यशास्त्र अभ्यासक श्रीरंजन आवटे हे प्रमुख वक्ते होते

बीबीसी मराठीचे संपादक अभिजित कांबळे आणि ‘द वायर’चे पत्रकार मोहम्मद इरफान यांच्या हस्ते सुमित सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे वाङ्मय व पुस्तके प्रदान करून सन्मानित करण्यात आले. संयुक्त महाराष्ट्र पत्रकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे यांच्यासह पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सुमित सोनवणे गेल्या दहा वर्षांपासून IBN लोकमत आणि News18 या वृत्तवाहिन्यांमध्ये ग्रामीण तसेच शहरी भागातील बातमीदारी करीत आहेत. या काळात त्यांनी समाजातील विविध प्रश्नांना आपल्या लेखणी आणि पत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, सामाजिक प्रश्न, प्रशासनातील त्रुटी, शेतकरी आणि वंचित घटकांचे प्रश्न सातत्याने मांडत त्यांनी पत्रकारितेची सामाजिक बांधिलकी जपली आहे.

निर्भीड, परखड आणि प्रश्नांच्या मुळाशी जाऊन बातमी मांडण्याची त्यांची शैली ही त्यांच्या पत्रकारितेची विशेष ओळख मानली जाते. कोणत्याही दबावाला बळी न पडता वस्तुस्थिती समाजासमोर आणण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला आहे. त्यांच्या याच पत्रकारितेची दखल घेत संयुक्त महाराष्ट्र पत्रकार महासंघाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

विशेष म्हणजे बीबीसी मराठीचे संपादक अभिजित कांबळे यांच्या हस्ते महात्मा फुले यांचे वाङ्मय स्वीकारून सन्मानित होणे, ही आपल्यासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब असल्याची भावना सुमित सोनवणे यांनी व्यक्त केली.

पत्रकार सुमित सोनवणे म्हणाले की “गेल्या दहा वर्षांपासून पत्रकारिता करताना समाजातील सामान्य माणसाचे प्रश्न मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. ग्रामीण आणि शहरी भागात काम करत असताना अनेक सामाजिक प्रश्न जवळून अनुभवता आले. त्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळवून देणे आणि प्रशासनाचे लक्ष वेधणे, ही पत्रकार म्हणून आपली जबाबदारी आहे.

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचे वाङ्मय मिळणे, हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. विशेषतः बीबीसी मराठीचे संपादक अभिजित कांबळे सर आणि ‘द वायर’चे पत्रकार मोहम्मद इरफान यांच्या हस्ते हा सन्मान मिळाल्याने या सन्मानाचे महत्त्व माझ्यासाठी अधिक आहे.

महात्मा फुले यांनी समाजातील विषमता, अन्याय आणि अज्ञानाविरोधात आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या विचारांचे वाङ्मय स्वीकारताना भविष्यातही सत्य, निर्भीडपणा आणि सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारिता करण्याची प्रेरणा मिळाली आहे. हा सन्मान माझ्यासाठी पुढील वाटचालीची नवी ऊर्जा आहे.”

सुमित सोनवणे यांच्या या सन्मानाबद्दल पत्रकारिता क्षेत्रातील सहकारी, मित्रपरिवार आणि विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

४१ किलो गांजासह दोघांना अटक; २५.५० लाखांचा मुद्देमाल जप्त बोरीपार्धी येथे स्थानिक गुन्हे शाखेची...

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (ता.०५) बेकायदेशीररीत्या गांजाची वाहतूक केल्याच्या प्रकरणी यवत पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बोरीपार्धी (ता.दौंड) च्या हद्दीत दोघांना अटक केली. या...

जुगाराची बातमी प्रसारित होताच खेळ बंद; नव्या ठिकाणी अड्डा हलवण्याची चर्चा!

बातमीचा धसका घेताच जुगाराचा डाव आवरला? नव्या जागेच्या शोधात जुगारचालक असल्याची नागरिकांमध्ये चर्चा...पाठबळ कोणाचे? ‘सेटिंग’ लावणारा तो शेठ कोण, याचीही परिसरात कुजबुज...पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष;...

खुटबाव येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई होणार का ? कारवाई न झाल्याने नागरिकांच्यात चर्चा…

जुगार सुरू ठेवण्यासाठी कुणाचे अभय गावात उलटसुलट चर्चेला उधाण.... यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.३०) खुटबाव परिसरात काटेरी झुडपांच्या आडोशाला जुगाराचा अड्डा सुरू असल्याची चर्चा गेल्या काही...

खुटबावच्या काटेरी झुडपात जुगाराचा अड्डा ? खुटबाव केडगाव रस्त्यालगत असणाऱ्या काटेरी झुडपात खेळला जात...

लाखो रुपयांचा जुगार खेळला जात असल्याची नागरिकांत चर्चा; पारगाव, केडगाव, एकेरेवाडी परिसरातूनही येतात जुगारी? कुणाच्या वरदहस्ताने चालवला जात आहे लाखोंचा जुगार, याबाबत नागरिकांच्यात उलटसुलट...

गर्भलिंग निदान प्रकरणातील आरोपी अण्णासाहेब गिरीला बलात्काराच्या गुन्ह्यातही अटक

यवत वार्ताहर (दि.२८) गर्भलिंग निदान प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या अण्णासाहेब आप्पा गिरी (वय ४२, रा. केडगाव स्टेशन, ता. दौंड, जि. पुणे) याला यवत पोलिसांनी बलात्काराच्या...

error: Content is protected !!