संघर्ष नायक वृत्तसेवा (ता.१७)
विरबॅक ॲनिमल हेल्थ इंडिया प्रा. ली. या कंपनीच्या सीएसआर निधीतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव येथे विद्यार्थ्यांना शंभर शालेय बाकांचे चे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने कंपनीचे मॅनेजर श्री. नितीन पवार, श्री. कल्याण चंदनशिवे, श्री. अभिषेक टिकल तसेच गावातील पशुवैद्य डॉ. ज्ञानदेव( माऊली) बोत्रे, डॉ. राहुल ताकवणे, डॉ. अमोल जामले, डॉ. राहुल गोलांडे आदी मान्यवर उपस्थित होते. या कामी गावातील पशु वैद्यकीय डॉक्टरांनी श्रम घेतले.
शाळा व शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्या सौ. मनीषा संतोष ताकवणे, माजी उपसभापती सयाजी ताकवणे, सरपंच श्री. सुभाष बोत्रे, दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. पोपटराव ताकवणे, माजी सरपंच श्री सर्जेराव जेधे, ग्रामपंचायत सदस्य किसन जगदाळे,ग्रा. पं. सदस्य रामकृष्ण ताकवणे, सामाजिक कार्यकर्ते विशाल ताकवणे, गणेश बोत्रे यांच्यासह ग्रामस्थ, पालक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज बोत्रे, उपाध्यक्षा रेखाताई भोसले, केंद्रप्रमुख श्याम बेंद्रे, मुख्याध्यापिका सौ. विजयश्री जगताप व सर्व शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शहाजी गिरे यांनी केले. सयाजी ताकवणे यांनी मनोगत व्यक्त केले, तर कंपनीचे मॅनेजर नितीन पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत कंपनीच्या सामाजिक उपक्रमांचा हेतू स्पष्ट केला.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका सौ. विजयश्री जगताप यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

मुख्य संपादक:
























