Homeक्राईम४१ किलो गांजासह दोघांना अटक; २५.५० लाखांचा मुद्देमाल जप्त बोरीपार्धी येथे स्थानिक...

४१ किलो गांजासह दोघांना अटक; २५.५० लाखांचा मुद्देमाल जप्त बोरीपार्धी येथे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (ता.०५)

बेकायदेशीररीत्या गांजाची वाहतूक केल्याच्या प्रकरणी यवत पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बोरीपार्धी (ता.दौंड) च्या हद्दीत दोघांना अटक केली. या कारवाईत एकूण ४१ किलो १८ ग्रॅम गांजा आणि मारुती स्विफ्ट डिझायर कार असा सुमारे २५ लाख ५० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास बोरीपार्धी गावच्या हद्दीत सुपा–केडगाव चौफुला रोडवरील दत्त मंगल कार्यालयाजवळ करण्यात आली. हर्षवर्धन अशोक बरडे (वय २९, सध्या रा. काळेपडळ, हडपसर, मूळ रा. रायगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) आणि कुशाल दत्तात्रय बिनवडे (वय ३०, सध्या रा. काळेपडळ, हडपसर, मूळ रा. वंजारवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.आरोपींच्या ताब्यातील स्विफ्ट डिझायर गाडी क्रं एमएच १२ डब्ल्यूएक्स ६५०५ यां  पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून गांजाची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने कारवाई केली. तपासणीदरम्यान दोन स्वतंत्र पोत्यांमध्ये प्लास्टिकच्या पट्टीने गुंडाळलेली बंडले आढळून आली. त्यामध्ये हिरवट-काळसर रंगाचा बियाबोंडे व भुगा असलेला गांजा आढळल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

पहिल्या पोत्यातून २० किलो ५०० ग्रॅम आणि दुसऱ्या पोत्यातून २० किलो ५१८ ग्रॅम, असा एकूण ४१ किलो १८ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. त्याची अंदाजे किंमत २० लाख ५० हजार ९०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय सुमारे ५ लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार जप्त करण्यात आली.

या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात अमली पदार्थ तस्करी आणि वाहतूक केल्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक नोंदीनुसार, आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी गांजाची बेकायदेशीर वाहतूक केल्याचा आरोप आहे.या प्रकरनी पोलीस हवालदार विकास कापरे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गाढवे हे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीबीसी मराठीचे संपादक अभिजित कांबळे यांच्या हस्ते पत्रकार सुमित सोनवणे यांचा सन्मान, महात्मा फुले...

दौंड संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०५) क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त संयुक्त महाराष्ट्र पत्रकार महासंघ, मुंबई यांच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांचा...

जुगाराची बातमी प्रसारित होताच खेळ बंद; नव्या ठिकाणी अड्डा हलवण्याची चर्चा!

बातमीचा धसका घेताच जुगाराचा डाव आवरला? नव्या जागेच्या शोधात जुगारचालक असल्याची नागरिकांमध्ये चर्चा...पाठबळ कोणाचे? ‘सेटिंग’ लावणारा तो शेठ कोण, याचीही परिसरात कुजबुज...पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष;...

खुटबाव येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई होणार का ? कारवाई न झाल्याने नागरिकांच्यात चर्चा…

जुगार सुरू ठेवण्यासाठी कुणाचे अभय गावात उलटसुलट चर्चेला उधाण.... यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.३०) खुटबाव परिसरात काटेरी झुडपांच्या आडोशाला जुगाराचा अड्डा सुरू असल्याची चर्चा गेल्या काही...

खुटबावच्या काटेरी झुडपात जुगाराचा अड्डा ? खुटबाव केडगाव रस्त्यालगत असणाऱ्या काटेरी झुडपात खेळला जात...

लाखो रुपयांचा जुगार खेळला जात असल्याची नागरिकांत चर्चा; पारगाव, केडगाव, एकेरेवाडी परिसरातूनही येतात जुगारी? कुणाच्या वरदहस्ताने चालवला जात आहे लाखोंचा जुगार, याबाबत नागरिकांच्यात उलटसुलट...

गर्भलिंग निदान प्रकरणातील आरोपी अण्णासाहेब गिरीला बलात्काराच्या गुन्ह्यातही अटक

यवत वार्ताहर (दि.२८) गर्भलिंग निदान प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या अण्णासाहेब आप्पा गिरी (वय ४२, रा. केडगाव स्टेशन, ता. दौंड, जि. पुणे) याला यवत पोलिसांनी बलात्काराच्या...

error: Content is protected !!