संघर्ष नायक वृत्तसेवा (ता.२३)
यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत मनुष्यवस्तीलगत पासून काही अंतरावर शेतात अवैधपणे गावठी हातभट्टी दारू तयार करण्यात येत असून याकडे मात्र यवत पोलिसांचे आणि या बिटच्या अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचे नागरिकांच्यात जोरदार चर्चा सुरु आहे.यां दारुभट्टी मुळे रात्रभर त्यांच्या वाहनाच्या आवाजाने आणि परिसरात उग्र वास यामुळे येथील नागरिक देखील त्रस्त आहेत मात्र कोणीही यां दारुभट्टी वाल्याच्या दहशत आणि पोलिसांच्या त्याच्या हितसंबंधामुळे तक्रार करण्यास पुढे येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
या दारुभट्टी वाल्याच्या अधिकारी वर्गाला दीड लाख रुपया पासून ते बिट अधिकारी यांना ४० हजार रुपयांपर्यंत महिन्याला रक्कम ठरलेली असल्याचे नागरिक बोलत आहे. यामध्ये वाहतूक करण्यासाठी पिकअप गाडीची व्यवस्था असून वाहतूक ज्या ज्या भागातून केली जाते त्या त्या भागातील अधिकारी आणि कर्मचारी यांना देखील २५ ते ३० हजार रुपये तसेच ज्या जागेत दारुभट्टी आहे त्या व्यक्तीला देखील ३० हजार महिना आणि त्याठिकाणी दारू तयार करण्यासाठी लागणारे पाणी हे सुधा दरमहा ५ हजार ठरले असल्याचे नागरिक दबक्या आवाजात चर्चा करत आहेत.गेली पाच महिन्यापासून विना अडथळा आणि विना कारवाई दारुभट्टी सुरु आहे.त्यामुळे यां दारुभट्टी चालवाणाऱ्या गृहस्थावर पोलीस प्रशासन मेहरबान असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
यां मेहरबान दारुभट्टी वाल्यामुळे पोलीस अधिकारी आणि प्रशासनाचे नाव बदनाम होत असून खाकी कुठेतरी डागाळाली तर जात नाही नाही असा सवाल यानिमित्त पुढे येत आहे. याच्या अवैध कमाईतून पोलीस आणि अधिकारी चांगले जोगावलेले असून त्यांना येणाऱ्या अधिकच्या उत्पन्नामुळे या पोलीस ठाणे हद्दीत दारुभट्टी सारखे अनेक अवैध धंद्यानी तोंड वर काढले असून याबाबत मात्र पोलीस मूग गिळून गप्प असल्याने कारवाई होत नसल्याची उलट सुलट चर्चा परिसरात आहे.
दारुभट्टीवर कारवाई होणार का ?
संबंधित अवैध दारुभट्टी वाल्या गृहस्थावर कारवाई होत नसल्याने त्यांचे आणि पोलिसांचे लागेबांधे असल्याची उलट सुलट चर्चा परिसरात आहे.त्याच्यावर आणि ज्या जागेत दारुभट्टी काढली जाते त्या जागामालकावर कारवाई होणार का असा देखील सवाल नागरिक करत आहेत.मात्र या दारुभट्टी वाल्या मेहरबान गृहस्थाला पोलीस प्रशासनातील कोणत्या अधिकाऱ्याच्या वरदहस्त आहे आणि तो अधिकारी कोण? कर्मचारी कारवाईस गेले तरी कारवाई थांबवनारा त्या अधिकाऱ्याची देखील चौकशी होणार का?पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल त्यांच्यावर कारवाई करणार का?असा देखील सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

मुख्य संपादक:
























