Homeताज्या बातम्याकर्मयोगी कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उन्हाळी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

कर्मयोगी कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उन्हाळी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

संघर्ष नायक वृत्तसेवा पारगाव ता. ११ :

पारगाव ता.दौंड येथील कर्मयोगी कुस्ती प्रशिक्षण केंद्रात सध्या उत्साहपूर्ण वातावरणात उन्हाळी कुस्ती शिबिर सुरू असून विविध तालुक्यांमधून या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळत आहे. सातारा, शिरूर, दौंड, इंदापूर आणि मावळ तालुक्यातील तब्बल ७५ मुले या शिबिरात सहभागी झाली असून भविष्यात उत्कृष्ट पैलवान घडवण्याचा संकल्प या प्रशिक्षण केंद्रामार्फत राबविला जात आहे.
आजच्या मोबाईल आणि डिजिटल युगात मुलांना मैदानी खेळांची आवड निर्माण व्हावी, शरीर सुदृढ राहावे आणि ग्रामीण भागातील पारंपरिक कुस्ती संस्कृती जपली जावी या उद्देशाने या उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कुस्तीतील माती आणि गादी या दोन्ही प्रकारांमध्ये मुलांना विशेष प्रशिक्षण दिले जात असून प्रत्येक डाव, तंत्र, बारकावे, शारीरिक क्षमता, चपळता आणि मानसिक तयारी यावर अनुभवी प्रशिक्षकांकडून सखोल मार्गदर्शन केले जात आहे.
शिबिरामध्ये सहभागी खेळाडूंसाठी उत्कृष्ट निवास व्यवस्था, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि पौष्टिक आहाराची विशेष सोय करण्यात आली आहे. सकाळचा नाश्ता, दूध, बदामाची थंडाई, फळे तसेच दुपारच्या जेवणात दोन भाज्या, चटणी, लोणचे, दही यांचा समावेश असून संध्याकाळी आठवड्यातून चार वेळा मांसाहारी जेवण दिले जाते. अत्यंत माफक शुल्कात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने पालकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. खेळाडूंच्या शारीरिक विकासासाठी आवश्यक पोषणमूल्यांचा विशेष विचार केला जात असून मुलांना घरच्यासारखे वातावरण मिळत आहे.
राष्ट्रीय कुस्ती पंच पै. रवींद्र बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मुले सराव करीत आहेत.कर्मयोगी कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे येथे केवळ शिबिरापुरते प्रशिक्षण न देता गुणवंत आणि कुस्तीची खरी आवड असलेल्या मुलांची निवड करून त्यांना पुढील काळात कायमस्वरूपी प्रशिक्षणाची संधी दिली जाते. या केंद्रातून आतापर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक पैलवान घडले असून यंदाच्या शिबिरातूनही गुणवंत खेळाडू घडवण्यासाठी केंद्र प्रयत्नशील आहे.
ग्रामीण भागातील युवकांनी व्यसनांपासून दूर राहून खेळाकडे वळावे, शिस्तबद्ध जीवन जगावे आणि महाराष्ट्राची पारंपरिक कुस्ती संस्कृती अधिक बळकट व्हावी, या उद्देशातून हे शिबिर प्रेरणादायी ठरत आहे. परिसरातील पालक व नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक होत असून भविष्यात अनेक नामांकित पैलवान या प्रशिक्षण केंद्रातून घडतील, असा विश्वास कर्मयोगी कुस्ती केंद्राचे प्रमुख मा. माऊली ताकवणे यांनी व्यक्त केले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शालेय अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडछाड प्रकरणी दोन युवकांवर पोस्को अंतर्गत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल….न्यायालयीन...

पारगाव,संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.२९) शिक्षणासाठी घराबाहेर पडणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना पारगाव परिसरात घडली आहे.पारगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते

पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या (झेडपी) इमारतीत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्या पदाधिकाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने मोठे नाट्य...

भारतीय शास्त्रज्ञांना मलेरिया थांबवण्याचा मार्ग सापडला असेल

नवी दिल्लीतील रस्त्यावर साचलेले पाणी. भारतामध्ये 2015 पासून मलेरियाच्या प्रकरणांमध्ये अंदाजे 80-87% घट नोंदवली गेली आहे. लडाख, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीसह अनेक प्रदेशांमध्ये अलीकडच्या...

पाऊस आणण्यासाठी सक्रिय मान्सून, सोसाट्याचा वारा महा | पुणे बातम्या

रविवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24 तासांत कुरवंडे येथे सर्वाधिक 123 मिमी, लव्हाळे येथे 60 मिमी आणि भोर येथे 50 मिमी पावसाची नोंद...

error: Content is protected !!