Homeक्राईमगर्भलिंग निदान प्रकरणातील आरोपी अण्णासाहेब गिरीला बलात्काराच्या गुन्ह्यातही अटक

गर्भलिंग निदान प्रकरणातील आरोपी अण्णासाहेब गिरीला बलात्काराच्या गुन्ह्यातही अटक

यवत वार्ताहर (दि.२८)

गर्भलिंग निदान प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या अण्णासाहेब आप्पा गिरी (वय ४२, रा. केडगाव स्टेशन, ता. दौंड, जि. पुणे) याला यवत पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्यातही अटक केली आहे. प्रोडक्शन वॉरंटच्या आधारे येरवडा मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने तपासासाठी २८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली असता आज दि. २८ रोजी न्यायालयात हजर केले असता त्याला पुन्हा न्यायालयीन कोठडी मंजूर झाली असून त्याची पुन्हा रवानगी येरवडा कारागृहात रवानगी झाली असल्याची माहिती यवत पोलिसांनी दिली आहे.

यवत पोलीस ठाण्यात दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी दाखल झालेल्या तक्रारीवरून गिरीविरुद्ध गु.र.नं. ९५२/२०२६ अन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, अण्णासाहेब गिरी हा गर्भलिंग निदान प्रकरणात न्यायालयीन कस्टडी रिमांडवर येरवडा मध्यवर्ती कारागृहात होता. या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांनी न्यायालयाकडून प्रोडक्शन वॉरंट प्राप्त करून दि. २४ सप्टेंबर रोजी त्याला कारागृहातून ताब्यात घेतले. त्यानंतर संबंधित गुन्ह्यात अटक करून विहित मुदतीत न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने अधिक तपासासाठी पोलीस कोठडी मंजूर केली.

गिरीविरुद्ध दाखल असलेल्या बलात्काराच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने यवत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. तपासादरम्यान पोलिसांकडून विविध बाबींची पडताळणी केली जात आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे हे पुढील तपास करीत आहेत. कारवाईत पोलीस हवालदार प्रमोद गायकवाड, सुहास देवकाते, पोलीस कॉन्स्टेबल धिरज जाधव, विनित कु-हाडे आणि मोहन भानवसे यांनी सहभाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खुटबावच्या काटेरी झुडपात जुगाराचा अड्डा ? खुटबाव केडगाव रस्त्यालगत असणाऱ्या काटेरी झुडपात खेळला जात...

लाखो रुपयांचा जुगार खेळला जात असल्याची नागरिकांत चर्चा; पारगाव, केडगाव, एकेरेवाडी परिसरातूनही येतात जुगारी? कुणाच्या वरदहस्ताने चालवला जात आहे लाखोंचा जुगार, याबाबत नागरिकांच्यात उलटसुलट...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

BIG BREKING NEWS गर्भलिंग निदान प्रकरणात SIT ची मोठी कारवाई ; मुख्य आरोपी आण्णा...

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (ता.०९) केडगाव ता. दौंड येथील बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणात यवत पोलीस ठाण्याच्या विशेष तपास पथकाने (SIT) तपासाची व्याप्ती वाढवत मोठी कारवाई...

‘मावशी, साप आला!’ म्हणत वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने हिसकावले यवत पोलिसांनी सराईत आरोपीला जेरबंद...

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८) शेतात काम करून झाडाजवळ बसलेल्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेला ‘मावशी, साप आला!’ असे सांगून घाबरवून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने...

यवत–भांडगाव–खुंटबाव परिसरात मटका व्यवसायाला ऊत; कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

दौंड संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८) यवत, भांडगाव आणि खुंटबाव परिसरात मटका व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. परिसरातील विविध ठिकाणी...

error: Content is protected !!