संघर्ष नायक वृत्तसेवा पारगाव (ता.१३)
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५-२६ अंतर्गत ग्रामपंचायत पारगाव, ता. दौंड, येथे मूल्यांकन प्रक्रिया पार पडली.आज (दि.१३) रोजी पंचायत समिती उरण, जि. रायगड येथील विशेष मूल्यांकन समिती उपस्थित होती. यावेळी आलेल्या सर्व समिती अधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून त्यांची गावच्या मुख्य पेठेतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
या समितीत उरण पंचायत समिती चे गट विकास अधिकारी सर्जेराव पाटील, विस्तार अधिकारी (पंचायत) विनोद मिंडे, विस्तार अधिकारी (आरोग्य) महेश काळे, विस्तार अधिकारी (कृषी) नरेश भोनकर तसेच तालुका समन्वयक हरिष आहेर यांनी ग्रामपंचायतीच्या विविध कामांचे सखोल मूल्यांकन केले.

अभियान कालावधीत पंचायत समिती दौंडचे गट विकास अधिकारी अरुण मरभळ, विस्तार अधिकारी संजय शिंदे तसेच कृषी अधिकारी रमेश भद्रोड यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अभियानात प्रभावी सहभाग घेणे व मूल्यांकन समितीसमोर कामकाज सादर करणे शक्य झाल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या डॉ. गायत्री खळदकर, पंचायत समिती सदस्या मनिषा ताकवणे, सरपंच सुभाष बोत्रे, उपसरपंच शुभांगी शिंदे, माजी उपसभापती सयाजी ताकवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आत्माराम ताकवणे, सोसायटी संचालक मच्छिंद्र ताकवणे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष शामराव ताकवणे, ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, ग्रामपंचायत अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी, बचत गट प्रतिनिधी व ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामविकास अधिकारी श्री. मुरलीधर बडे तसेच श्री. रामकृष्ण ताकवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

मुख्य संपादक:
























