संघर्षनायक पारगाव (दि.३०)
खासदार सुप्रिया सुळे यांनी (दि.३०) रोजी दौंड तालुक्याच्या दौऱ्यात विविध ठिकाणी भेटी देत नागरिक, कार्यकर्ते व विविध संस्थांशी संवाद साधला. ‘आपला मतदारसंघ, आपला अभिमान’ या अभियानांतर्गत त्यांनी यावेळी दौंड तालुक्यातील पिंपळगाव येथील बापूराव नातू यांची मुले संतोष, सतीश, राजेश नातू यांनी उभारलेल्या गिरीष ऍग्रो फूड्स यां बंधुच्या या रसायनविरहित गूळ व गुळापासून विविध पदार्थ तयार करणाऱ्या प्रकल्पाला भेट दिली.

यावेळी सुळे यांनी गूळ उत्पादनाची प्रक्रिया, प्रकल्पातील स्वच्छता तसेच विविध गुळाच्या पदार्थांची पाहणी केली. रसायनविरहित पद्धतीने दर्जेदार गूळ उत्पादन करण्याच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. प्रकल्पातील स्वच्छता व उत्पादनाची गुणवत्ता पाहून समाधान व्यक्त करत नातू बंधूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दौऱ्यादरम्यान सुळे यांनी नानगाव येथे राष्ट्रवादी कॉ. माजी युवक अध्यक्ष विकास खळदकर यांचे वडील स्व. पोपटराव खळदकर यांच्या निधनानिमित्त खळदकर कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच पिंपळगाव येथील सिद्धेश्वर महाविद्यालयात इंटरॲक्टिव्ह ३-पॅनल (ई-लर्निंग बोर्ड) व तालीम केंद्राचे उद्घाटन केले.
यानंतर राहू येथे विद्युत प्रवाहाचा धक्का लागून मृत्यू झालेल्या भोईटे बंधूंच्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेतली . दौंड येथे कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेत त्यांनी तालुक्यातील विविध विषयांवर कार्यकर्त्यांशी चर्चा केली.
या वेळी तालुका अध्यक्ष रामभाऊ टुले, अजित शितोळे, चैतन्य पाटोळे, सचिन गायकवाड, संपत शितोळे, प्रसन्न कापरे, रोहिदास कापरे, पुष्कर पुरोहित, आप्पासो नातू, महेश थोरात, दिपक कापरे शंकर शेलार यांचे सह पिंपळगाव ग्रामस्थ उपस्थित होते.

मुख्य संपादक:
























