दौंड संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८)
यवत, भांडगाव आणि खुंटबाव परिसरात मटका व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. परिसरातील विविध ठिकाणी खुलेआम मटका घेण्यात येत असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे.
या बेकायदेशीर व्यवसायामुळे परिसरातील तरुणांसह सर्वसामान्य नागरिकांवर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, हा व्यवसाय नेमका कोणाच्या पाठबळावर किंवा वरदहस्ताने सुरू आहे, असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.
मटका व्यवसायामुळे आर्थिक नुकसान, कुटुंबातील वाद तसेच सामाजिक वातावरणावर होणाऱ्या परिणामांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे यवत पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून मटका व्यवसाय चालविणाऱ्यांवर तसेच त्यांना मदत करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, संबंधित ठिकाणी प्रत्यक्षात मटका व्यवसाय सुरू आहे का, तसेच या आरोपांमध्ये तथ्य किती आहे, याची अधिकृत माहिती पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पोलीस प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष…पोलीस प्रशासनाने तातडीने चौकशी करून कारवाई करावी!
यवत–भांडगाव–खुंटबाव परिसरात मटका व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी व चर्चांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. संबंधित ठिकाणी गुप्त पथकामार्फत पाहणी करून वस्तुस्थितीची खातरजमा करावी, तसेच बेकायदेशीर व्यवसाय आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी.
मटका व्यवसायाला कोणाचे पाठबळ अथवा संरक्षण आहे का, याचीही निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
“बेकायदेशीर मटका व्यवसायाला आळा घालून परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन आता कोणती भूमिका घेणार?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पोलीस प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे यवत–भांडगाव–खुंटबाव परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मुख्य संपादक:
























