Homeताज्या बातम्या“कायद्याला हरताळ फासून कुरकुंभमध्ये मटका व्यवसाय तेजीत”...मटका किंग बिनधास्त...

“कायद्याला हरताळ फासून कुरकुंभमध्ये मटका व्यवसाय तेजीत”…मटका किंग बिनधास्त…

संघर्ष नायक वृत्तसेवा वार्ताहर ता.१८

कुरकुंभ (ता. दौंड) येथे कायद्याचा धाक संपलाय का, असा सवाल उपस्थित करणारी धक्कादायक बाब कुरकुंभ परिसरात उघडकीस येत आहे. कुरकुंभ पोलीस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावरच अवैध मटका व्यवसाय खुलेआम आणि जोमात सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पुणे–सोलापूर महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या सेवा रस्त्यालगत, कुरकुंभ पुलाजवळील स्थानक परिसरात हा मटका अड्डा सुरू असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. दिवसरात्र सुरू असलेल्या या अवैध धंद्यामुळे परिसरातील वातावरण दूषित होत असून, तरुण पिढी चुकीच्या मार्गाला लागण्याचा धोका वाढला आहे. विशेष म्हणजे, इतक्या उघडपणे सुरू असलेला हा व्यवसाय पोलीसांच्या नजरेतून कसा सुटतो, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

स्थानिक नागरिकांमध्ये याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “पोलीस ठाण्याच्या जवळच हा प्रकार सुरू असेल, तर दूरच्या भागात काय चालत असेल?” असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. काहींच्या मते, या अवैध व्यवसायाला कुणाचे तरी ‘अभय’ मिळत असल्याशिवाय इतक्या निर्भीडपणे हा धंदा चालू शकत नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

मटका हा केवळ बेकायदेशीर व्यवसाय नसून, तो अनेक कुटुंबांच्या आर्थिक आणि सामाजिक आयुष्याचा विनाश करणारा विषारी विळखा आहे. तरीही प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे अशा अड्ड्यांना चालना मिळत असल्याचे दिसून येते. यामुळे शासनाच्या ‘कायद्याचे राज्य’ या संकल्पनेलाच धक्का बसत आहे.

या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करावा, संबंधित मटका अड्ड्यावर छापा टाकून कारवाई करावी आणि या मागील सूत्रधारांचा पर्दाफाश करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. अन्यथा, नागरिकांचा कायद्यावरील विश्वास आणखी ढासळण्याची भीती व्यक्त होत आहे.

दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्याशी संपर्क केला असता ते मिटिंग मध्ये असल्याचे सांगण्यात आले असून अधिकची माहिती मिळू शकली नाही .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

BIG BREKING NEWS गर्भलिंग निदान प्रकरणात SIT ची मोठी कारवाई ; मुख्य आरोपी आण्णा...

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (ता.०९) केडगाव ता. दौंड येथील बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणात यवत पोलीस ठाण्याच्या विशेष तपास पथकाने (SIT) तपासाची व्याप्ती वाढवत मोठी कारवाई...

‘मावशी, साप आला!’ म्हणत वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने हिसकावले यवत पोलिसांनी सराईत आरोपीला जेरबंद...

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८) शेतात काम करून झाडाजवळ बसलेल्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेला ‘मावशी, साप आला!’ असे सांगून घाबरवून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने...

यवत–भांडगाव–खुंटबाव परिसरात मटका व्यवसायाला ऊत; कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

दौंड संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८) यवत, भांडगाव आणि खुंटबाव परिसरात मटका व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. परिसरातील विविध ठिकाणी...

बोरीएंदीच्या निखिल दीक्षितची AI मध्ये भरारी

यवत संघर्ष नायक प्रतिनिधी दि . ३०  दौंड तालुक्यातील बोरीएंदी येथील सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या निखिल देविदास दीक्षित यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत फिल्म मेकिंग,...

खासदार सुप्रिया सुळे यांची पिंपळगाव येथील गिरीष ऍग्रो फूड्सला भेट….नातू बंधुचे केले कौतुक…

संघर्षनायक पारगाव (दि.३०)  खासदार सुप्रिया सुळे यांनी (दि.३०) रोजी दौंड तालुक्याच्या दौऱ्यात विविध ठिकाणी भेटी देत नागरिक, कार्यकर्ते व विविध संस्थांशी संवाद साधला. ‘आपला मतदारसंघ,...

error: Content is protected !!