Homeउद्योगकुरकुंभमधील कंपनीवर रात्रीची धाड; ६ तास तपासणीने खळबळ! नमुने तपासणीसाठी जप्त; कंपनी...

कुरकुंभमधील कंपनीवर रात्रीची धाड; ६ तास तपासणीने खळबळ! नमुने तपासणीसाठी जप्त; कंपनी सील झाल्याची चर्चा, मात्र अधिकृत खुलासा अद्याप नाही..

संघर्ष नायक वृत्तसेवा कुरकुंभ ता. ०१

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीवर २९ जून रोजी रात्री विशेष तपास पथक आणि दौंड पोलिसांनी संयुक्त कारवाई केल्याने औद्योगिक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सुमारे सहा ते साडेसहा तास चाललेल्या या कारवाईनंतर कंपनी सील करण्यात आल्याची चर्चा रंगली असली, तरी याबाबत प्रशासनाने कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेसात ते आठच्या दरम्यान पोलिसांच्या वाहनांचा ताफा कंपनी परिसरात दाखल झाला. त्यानंतर संपूर्ण परिसर बंद करून अधिकाऱ्यांनी मध्यरात्री उशिरापर्यंत सखोल तपासणी केली. या काळात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सतत ये-जा सुरू असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

सूत्रांच्या माहितीनुसार, कंपनीच्या अधिकृत नोंदीतील नाव आणि प्रत्यक्ष कंपनीसमोरील फलकावरील नाव वेगवेगळे असल्याचे तपासादरम्यान निदर्शनास आल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंपनीला १० मे २०२४ रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आवश्यक संमती नाकारण्यात आली होती. धोकादायक कचऱ्याची अयोग्य साठवण, कच्च्या मालाचे नियमबाह्य व्यवस्थापन आणि आवश्यक परवानग्यांअभावी आक्षेप नोंदविण्यात आल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, याच परिसरातील एका प्रयोगशाळेवर काही वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपयांच्या अमली पदार्थ प्रकरणात कारवाई झाल्याची नोंद आहे. मात्र त्या प्रकरणाचा आणि सध्याच्या कारवाईचा संबंध असल्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, कंपनीतील उत्पादनाचे नमुने तपासणीसाठी जप्त करण्यात आले आहेत. मात्र कंपनी सील करण्यात आल्याच्या चर्चेला त्यांनी दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे या कारवाईचे नेमके कारण काय, तपासात काय आढळले आणि पुढील कारवाई कोणत्या दिशेने होणार, याकडे संपूर्ण कुरकुंभ परिसराचे लक्ष लागले आहे.

अधिकृत खुलासा होईपर्यंत या कारवाईबाबत विविध तर्कवितर्क सुरू असले, तरी तपास यंत्रणेकडून अद्याप मौन कायम आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

BIG BREKING NEWS गर्भलिंग निदान प्रकरणात SIT ची मोठी कारवाई ; मुख्य आरोपी आण्णा...

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (ता.०९) केडगाव ता. दौंड येथील बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणात यवत पोलीस ठाण्याच्या विशेष तपास पथकाने (SIT) तपासाची व्याप्ती वाढवत मोठी कारवाई...

‘मावशी, साप आला!’ म्हणत वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने हिसकावले यवत पोलिसांनी सराईत आरोपीला जेरबंद...

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८) शेतात काम करून झाडाजवळ बसलेल्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेला ‘मावशी, साप आला!’ असे सांगून घाबरवून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने...

यवत–भांडगाव–खुंटबाव परिसरात मटका व्यवसायाला ऊत; कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

दौंड संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८) यवत, भांडगाव आणि खुंटबाव परिसरात मटका व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. परिसरातील विविध ठिकाणी...

बोरीएंदीच्या निखिल दीक्षितची AI मध्ये भरारी

यवत संघर्ष नायक प्रतिनिधी दि . ३०  दौंड तालुक्यातील बोरीएंदी येथील सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या निखिल देविदास दीक्षित यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत फिल्म मेकिंग,...

खासदार सुप्रिया सुळे यांची पिंपळगाव येथील गिरीष ऍग्रो फूड्सला भेट….नातू बंधुचे केले कौतुक…

संघर्षनायक पारगाव (दि.३०)  खासदार सुप्रिया सुळे यांनी (दि.३०) रोजी दौंड तालुक्याच्या दौऱ्यात विविध ठिकाणी भेटी देत नागरिक, कार्यकर्ते व विविध संस्थांशी संवाद साधला. ‘आपला मतदारसंघ,...

error: Content is protected !!