संघर्ष नायक वृत्तसेवा पारगाव (ता.९) : दौंड तालुक्यातील पारगाव येथील माजी सरपंच तथा सेवानिवृत्त शिक्षक अरुण चंद्रकांत बोत्रे यांचे दि. ५ मे रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अरुण बोत्रे यांनी शिक्षक म्हणून अनेक विद्यार्थ्यांना घडविले. तसेच श्री तुकाईदेवी ट्रस्टचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. स्पष्टवक्तेपणा, न्यायप्रिय स्वभाव आणि समाजातील प्रत्येक घटकाला आधार देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित होते. गावातील अनेक वाद-विवाद शांतपणे सोडविणारे “चालते-बोलते न्यायालय” अशी त्यांची ओळख होती.
त्यांच्या अंत्यविधीस मोठ्या संख्येने ग्रामस्थ, नातेवाईक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. भाजपा दौंड तालुका सरचिटणीस वैभव बोत्रे यांचे ते वडील होत.
दशक्रिया विधी गुरुवार दि.१४ रोजी पारगाव भिमा नदी घाट या ठिकाणी होणार असून ह. भ. प. गणेश महाराज जगताप यांची प्रवचन सेवा होणार असल्याचे असल्याचे बोत्रे कुटुंबिया कडून सांगण्यात आले आहे.

मुख्य संपादक:
























