Homeउद्योगमृतदेह रस्त्यावर टाकून अपघाताचा बनाव; गुऱ्हाळावरील मजुराच्या मृत्यूप्रकरणी चौघांवर गुन्हा...पुरावे नष्ट करण्याचा...

मृतदेह रस्त्यावर टाकून अपघाताचा बनाव; गुऱ्हाळावरील मजुराच्या मृत्यूप्रकरणी चौघांवर गुन्हा…पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न….यवत पोलिसांकडून गुन्ह्याची उकल….

संघर्ष नायक वृत्तसेवा ता. ०१ :

 दौंड तालुक्यातील खामगाव येथील गाडीमोड परिसरातील गुऱ्हाळावर काम करणाऱ्या उत्तर प्रदेशातील २३ वर्षीय मजुराचा जेसीबीखाली चिरडून मृत्यू झाल्यानंतर हा अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारमधून नेऊन वाघोली–राहू रस्त्यावर टाकून रस्ते अपघाताचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार यवत पोलिसांच्या तपासात उघड झाला आहे. या प्रकरणी जेसीबी चालक, मालकासह अन्य तिघांविरुद्ध यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत मजुराचे नाव रामू शंभू पासी (वय २३, रा. कोला, जि. सीतापूर, उत्तर प्रदेश) असे असून, तो एप्रिल २०२६ पासून गाडीमोड येथील गुऱ्हाळावर मजूर म्हणून काम करत होता. त्याचा भाऊ राजू शंभू पासी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जेसीबी मालक अविनाश बाळासाहेब यादवगणेश हरिभाऊ जगतापकल्लू ऊर्फ प्रधान इस्तकार आणि जेसीबी चालक आलम यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ जूनच्या मध्यरात्री गुऱ्हाळावर जेसीबीचे काम सुरू असताना चालक आलम याने निष्काळजीपणे जेसीबी चालविल्याने झोपलेल्या रामू पासीच्या अंगावर जेसीबी गेली. या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती तातडीने पोलिसांना न देता, हा प्रकार लपविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. फिर्यादीनुसार, जेसीबी मालकाने उपस्थित कामगारांना घटना कोणालाही सांगू नका, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी संगनमत करून रामूचा मृतदेह कारच्या डिकीत ठेवला आणि पहाटेच्या सुमारास वाघोली–राहू रस्त्यावर टाकून तो रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडल्याचा बनाव रचल्याचे तपासात समोर आले आहे.

दरम्यान, ठेकेदार तमेरेज फरीदी यांनी रामू बेपत्ता झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर त्याचा भाऊ राजू पासी उत्तर प्रदेशातून दौंड येथे दाखल झाला. दोन दिवस विविध ठिकाणी शोध घेतल्यानंतर २१ जून रोजी गुऱ्हाळावर चौकशी केली असता संशय निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, अपघात लपवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. यवत पोलीस पुढील तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

BIG BREKING NEWS गर्भलिंग निदान प्रकरणात SIT ची मोठी कारवाई ; मुख्य आरोपी आण्णा...

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (ता.०९) केडगाव ता. दौंड येथील बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणात यवत पोलीस ठाण्याच्या विशेष तपास पथकाने (SIT) तपासाची व्याप्ती वाढवत मोठी कारवाई...

‘मावशी, साप आला!’ म्हणत वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने हिसकावले यवत पोलिसांनी सराईत आरोपीला जेरबंद...

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८) शेतात काम करून झाडाजवळ बसलेल्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेला ‘मावशी, साप आला!’ असे सांगून घाबरवून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने...

यवत–भांडगाव–खुंटबाव परिसरात मटका व्यवसायाला ऊत; कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

दौंड संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८) यवत, भांडगाव आणि खुंटबाव परिसरात मटका व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. परिसरातील विविध ठिकाणी...

बोरीएंदीच्या निखिल दीक्षितची AI मध्ये भरारी

यवत संघर्ष नायक प्रतिनिधी दि . ३०  दौंड तालुक्यातील बोरीएंदी येथील सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या निखिल देविदास दीक्षित यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत फिल्म मेकिंग,...

खासदार सुप्रिया सुळे यांची पिंपळगाव येथील गिरीष ऍग्रो फूड्सला भेट….नातू बंधुचे केले कौतुक…

संघर्षनायक पारगाव (दि.३०)  खासदार सुप्रिया सुळे यांनी (दि.३०) रोजी दौंड तालुक्याच्या दौऱ्यात विविध ठिकाणी भेटी देत नागरिक, कार्यकर्ते व विविध संस्थांशी संवाद साधला. ‘आपला मतदारसंघ,...

error: Content is protected !!