Homeताज्या बातम्यालेखापरीक्षकांचे चौथे राज्यव्यापी अधिवेशन आळंदी येथे उत्साहात संपन्न...

लेखापरीक्षकांचे चौथे राज्यव्यापी अधिवेशन आळंदी येथे उत्साहात संपन्न…

संघर्ष नायक वृत्तसेवा आळंदी (ता.२६)

ऑडिटर्स कौन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशन या सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षकांचे चौथे राज्यव्यापी अधिवेशन आळंदी येथे उत्साहात संपन्न झाले. या अधिवेशनास ३२ जिल्ह्यांमधून जवळपास ६०० लेखापरीक्षक उपस्थित होते. यावेळी सहकार खात्याचे अप्पर निबंधक तुषार काकडे, सहनिबंधक रावसाहेब जंगले, शासनाचे निवृत्त अप्पर सचिव एस बी पाटील, सहकार भारतीचे प्रदेश महामंत्री विवेक जुगादे,आळंदी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे ,हभप डॉ. नारायणमहाराज जाधव राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, आय एस एस सी चे सेक्रेटरी अनिल करंजकर, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी लेखापरीक्षक व पतसंस्था यांनी एक विचाराने सहकारी चळवळीसाठी काम करूया असे आवाहन केले. सहकार भारतीचे विवेक जुगादे यांनी लेखापरीक्षकांनी संघटित होऊन आपल्या न्याय मागण्यासाठी लढा द्यावा व संघटनेच्या सभासद संख्येत जास्तीत जास्त वाढ करून आपली एकीची ताकद शासनास दाखवून द्यावी असे विचार मांडले. लेखापरीक्षकांच्या कोणत्याही अडचणीसाठी सहकार भारती नेहमीच मदत करेल असे त्यांनी सांगितले.
सहकार खात्यातील विविध अधिकाऱ्यांनीही                    लेखापरीक्षकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. अनिल कारंजकर यांनी लेखापरीक्षण व ए आय याविषयी मार्गदर्शन केले
या दोन दिवसीय अधिवेशनामध्ये सर्व लेखापरीक्षकांसाठी खुले चर्चासत्र ठेवण्यात आले. लेखापरीक्षकांच्या अडचणी, सूचना यावर सर्वांनी एकत्रितपणे मंथन केले. पुढील कालावधीमध्ये सहकार खात्याला निवेदने देऊन कामे होत नसतील तर कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याचेही ठरविण्यात आले.
यावेळी लेखापरीक्षणाचे उत्कृष्ट काम करणाऱ्या लेखापरीक्षकांचाही सन्मान करण्यात आला. जिल्हा वाईज लेखा परीक्षकांना पुरस्काराने गौरविण्यात आले. राज्यामध्ये प्रथम पुरस्कार जळगाव येथील प्रकाश चौधरी यांनी पटकावला. याचबरोबर सहकार गौरव हा मानाचा पुरस्कार संभाजीनगर येथील संजय वाणी यांना प्रदान करण्यात आला. सहकार सेवा पुरस्कार रत्नागिरी येथील लक्ष्मण ठाकूर यांना देण्यात आला. तसेच विविध कार्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लेखा परीक्षकांमधून सौ वैजयंता कुलकर्णी यांना अथलेटिक्स साठी तर रूपाली पाटील यांना कवयित्री म्हणून पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमास वरील पाहुण्यांना व्यतिरिक्त शांतीलाल सिंघवी, सुहास पटवर्धन, ऑडीटर्स कौन्सिलचे अध्यक्ष रामदास शिर्के, उपाध्यक्ष आबासाहेब देशमुख, सचिव उमेश देवकर, सहसचिव दत्तात्रय पवार, खजिनदार संदीप नगरकर, विश्वस्त व सहसंयोजक बाळासाहेब वाघ, विश्वस्त श्रीकांत चौगुले, संजय घोलप, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वस्त श्रीकांत चौगुले यांनी केले तर आभार प्रदर्शन नियोजन समिती अध्यक्षा राधा तुंगे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांच्या संख्याबळावर, तर भाजपने पुणे एमएलसी जागेवर दावा ठोकण्याच्या अलीकडच्या हालचालींवर

माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष सुनील टिंगरे रविवारी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते पुणे: जिल्हाभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाचे सर्वाधिक सदस्य...

सार्वजनिक रस्त्यावर केक कापल्याप्रकरणी पुण्याच्या माजी नगरसेवकासह सहा जणांवर गुन्हा दाखल

पुणे : सार्वजनिक रस्त्यावर टेबल ठेवून आणि केक कापून वाढदिवस साजरा करणे येरवड्यातील गाडीतळ येथील एका माजी नगरसेवकाला शुक्रवारी पहाटे एकच्या सुमारास...

हिंजवडी पूर्व पावसाळ्याच्या कामांसाठी पीएमआरडीएच्या प्रमुखांनी ३१ मेची मुदत दिली, त्रुटी आढळल्यास कारवाईचा इशारा

हिंजवडी परिसरात पावसाळापूर्व कामांचा एक भाग म्हणून स्ट्रॉम वॉटर नाले आणि नैसर्गिक नाले साफ करण्याचे काम पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने...

कचरा वेचक युनियनला PMC आरोग्य योजनेत नागरी कर्मचाऱ्यांचा समावेश हवा आहे | पुणे बातम्या

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) त्यांच्या कामगारांना लाइफ कव्हर द्यावे आणि नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी...

ग्राहक उपाय विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

error: Content is protected !!