Homeक्राईमदौंडच्या खामगावमध्ये सुमारे ५ लाखांचा गांजा जप्त, एकाला अटक

दौंडच्या खामगावमध्ये सुमारे ५ लाखांचा गांजा जप्त, एकाला अटक

संघर्ष नायक वृत्तसेवा यवत 

यवत पोलिसांनी आणि कोल्हापूर अंमली पदार्थांविरोधी पथकाने मोठी कारवाई करत खामगाव येथून तब्बल ४ लाख ८७ हजार ९०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला असून या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर दुसरा आरोपी फरार आहे.मिळालेल्या माहितीनुसार, यवत पोलिस स्टेशन हद्दीतील खामगाव येथील पाण्याच्या टाकीजवळील पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या गांजा साठवून विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला आणि यवत पोलिसांना मिळाली होती.या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ छापा टाकला.छाप्यामध्ये आकाश अशोक मोहिते (वय २३, रा. खामगाव) हा संशयास्पद अवस्थेत गांजा विक्री करत असल्याचे आढळून आला.त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडून व शेडमधून ८ किलोपेक्षा जास्त वजनाचा गांजा हस्तगत करण्यात आला.जप्त केलेल्या अंमली पदार्थाची किंमत ४ लाख ८७ हजार ९०० इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

चौकशीत आरोपी आकाश मोहिते याने हा गांजा सागर उत्तम चव्हाण (रा. खामगाव, ता. दौंड) याचा असून त्याच्या सांगण्यावरून विक्री करत असल्याची कबुली दिली.यावरून पोलिसांनी दोघांविरुद्ध एन.डी.पी.एस. कायदा व बी.एन. एस. २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी आकाश मोहिते याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ३१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.दरम्यान, फरार आरोपी सागर चव्हाण याचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे करीत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे, अक्षय मोरे, पोलीस हवालदार गुरुनाथ गायकवाड, संदीप देवकर, गणेश कुतवळ, दत्ता काळे, हिरालाल खोमणे तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक, कोल्हापूर परीक्षेत्र यांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शालेय अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडछाड प्रकरणी दोन युवकांवर पोस्को अंतर्गत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल….न्यायालयीन...

पारगाव,संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.२९) शिक्षणासाठी घराबाहेर पडणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना पारगाव परिसरात घडली आहे.पारगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते

पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या (झेडपी) इमारतीत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्या पदाधिकाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने मोठे नाट्य...

भारतीय शास्त्रज्ञांना मलेरिया थांबवण्याचा मार्ग सापडला असेल

नवी दिल्लीतील रस्त्यावर साचलेले पाणी. भारतामध्ये 2015 पासून मलेरियाच्या प्रकरणांमध्ये अंदाजे 80-87% घट नोंदवली गेली आहे. लडाख, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीसह अनेक प्रदेशांमध्ये अलीकडच्या...

पाऊस आणण्यासाठी सक्रिय मान्सून, सोसाट्याचा वारा महा | पुणे बातम्या

रविवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24 तासांत कुरवंडे येथे सर्वाधिक 123 मिमी, लव्हाळे येथे 60 मिमी आणि भोर येथे 50 मिमी पावसाची नोंद...

error: Content is protected !!