Homeताज्या बातम्यावरवंड-पारगाव गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ.गायत्री खळदकर यांचा दणदणीत विजय,भाजपाच्या सारिका दिवेकर यांचा...

वरवंड-पारगाव गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ.गायत्री खळदकर यांचा दणदणीत विजय,भाजपाच्या सारिका दिवेकर यांचा केला पराभव.

 संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.१०)
      दौंड तालुक्यातील वरवंड-पारगाव जिल्हा परिषद गटाची निवडणूक म्हणजे मोठी काटे की टक्कर होती.त्यामुळे संबंध तालुक्याचे लक्ष या लढतीकडे लागून राहिले होते.भाजपासाठी ही प्रतिष्ठाची लढाई मानली जात होती.मात्र या गटात राष्टवादी काँग्रेस च्या डॉ.गायत्री खळदकर यांनी आमदार राहुल कुल यांचे खांदे समर्थक असणाऱ्या भाजपाचे कार्यकर्ते संजय दिवेकर यांच्या पत्नी सारिका दिवेकर यांचा प्रांचड मोठ्या मताधिक्य मिळवून पराभव केला असल्याने ही वरवंड पारगाव गटाची निवडणुकीने धुराळा उडवला असल्याचे बोलले जात आहे.
मात्र या गटात राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ. गायत्री विशाल खळदकर, भाजपाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य संजय दिवेकर यांच्या पत्नी सारिका दिवेकर, तसेच शिवसेनेकडून (शिंदेगट) मानसी ताकवणे आणि योगिनी दिवेकर या उमेदवार मैदानात होत्या.चारही उमेदवारांनी जोरदार प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधला. घराघरांत भेटी, कोपरा सभा, पदयात्रा, महिला मेळावे यामुळे निवडणूक रंगतदार झाली होती.
     याठिकाणी सारिका दिवेकर या स्थानिक पातळीवरील आणि डॉ.गायत्री खळदकर या दोनच उमेदवार यांच्यात आमणे सामने लढत आणि खरी काटे की टक्कर होती. या गटाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत वातावरण दोनही गटाकडून चांगलेच ढवळून निघाले होते.ते मतदान होईपर्यंत चांगलेच तापलेले वातावरण वरवंड पारगाव गटात होते. त्यानंतर मतदानानंतर मतमोजणीपर्यंत कोण विजयी होतेय आणि किती मताने आघाडी आणि पिछाडीवर राहिलं याच्याच चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या.

मात्र दोन्ही बाजूंनी मोठी ताकद लावण्यात आली होती. अखेर झालेल्या मतमोजणीत डॉ.गायत्री खळदकर यांनी १५,१७६ मते मिळवत सारिका दिवेकर यांच्यावर ३७०५ मतांची आघाडी घेत विजय संपादन केला.या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.तसेच वरवंड गणातील निवडणूकही तितकीच चुरशीची ठरली.

मतदारांचे मानले आभार…..
डॉ.गायत्री खळदकर आणि त्यांचे पती डॉ. विशाल खळदकर यांनी वरवंड पारगाव गटातील सर्व उमेदवार यांचे जाहिर आभार मानले आणि हा विजय आमचा नसून सर्व मतदार यांचा आहे.जनतेनेचं ही निवडणूक हातात घेतली होती आणि त्यामुळे आमचा विजय झाला असून स्व.अजित पवार यांच्या व्हिजनप्रमाणे काम करून विकासात्मक धोरण अवलंबील असे मत नवनिर्वाचित ज़िल्हा परिषद उमेदवार डॉ.गायत्री खळदकर यांनी व्यक्त केले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

BIG BREKING NEWS गर्भलिंग निदान प्रकरणात SIT ची मोठी कारवाई ; मुख्य आरोपी आण्णा...

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (ता.०९) केडगाव ता. दौंड येथील बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणात यवत पोलीस ठाण्याच्या विशेष तपास पथकाने (SIT) तपासाची व्याप्ती वाढवत मोठी कारवाई...

‘मावशी, साप आला!’ म्हणत वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने हिसकावले यवत पोलिसांनी सराईत आरोपीला जेरबंद...

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८) शेतात काम करून झाडाजवळ बसलेल्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेला ‘मावशी, साप आला!’ असे सांगून घाबरवून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने...

यवत–भांडगाव–खुंटबाव परिसरात मटका व्यवसायाला ऊत; कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

दौंड संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८) यवत, भांडगाव आणि खुंटबाव परिसरात मटका व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. परिसरातील विविध ठिकाणी...

बोरीएंदीच्या निखिल दीक्षितची AI मध्ये भरारी

यवत संघर्ष नायक प्रतिनिधी दि . ३०  दौंड तालुक्यातील बोरीएंदी येथील सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या निखिल देविदास दीक्षित यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत फिल्म मेकिंग,...

खासदार सुप्रिया सुळे यांची पिंपळगाव येथील गिरीष ऍग्रो फूड्सला भेट….नातू बंधुचे केले कौतुक…

संघर्षनायक पारगाव (दि.३०)  खासदार सुप्रिया सुळे यांनी (दि.३०) रोजी दौंड तालुक्याच्या दौऱ्यात विविध ठिकाणी भेटी देत नागरिक, कार्यकर्ते व विविध संस्थांशी संवाद साधला. ‘आपला मतदारसंघ,...

error: Content is protected !!