Homeताज्या बातम्याश्रीराम जन्मोत्सव पारगावात भक्तिभावात साजरा; भव्य शोभायात्रेने वेधले लक्ष

श्रीराम जन्मोत्सव पारगावात भक्तिभावात साजरा; भव्य शोभायात्रेने वेधले लक्ष

संघर्ष नायक वृत्तसेवा पारगाव ता. २७

पारगाव येथे दि. २६ मार्च २०२६ रोजी श्रीराम जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळच्या सत्रात ह.भ.प. सुनील महाराज यादव (फलटण) यांचे हरिकीर्तन पार पडले. त्यांच्या प्रभावी कीर्तनाने उपस्थित भाविकांना आध्यात्मिक मार्गदर्शन मिळाले. यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला स.प. महाविद्यालयाचे डॉ. पोपट शिंदे (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाहक) यांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
सायंकाळी श्रीराम नवमी निमित्त भव्य व दिव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे प्रभू श्रीराम लल्लाची सुमारे ६.५ फूट उंचीची देखणी प्रतिमा होती. शोभायात्रेत वडगाव रासाई येथील प्रसिद्ध तिरंगा झांज पथकाने वातावरण भारावून टाकले, तर वैभव लक्ष्मी साऊंड सिस्टिमच्या सुरेल ध्वनी व्यवस्थेने कार्यक्रमात रंगत आणली.
यासोबतच रांजणगाव सांडस येथील लेझीम पथकाने सादर केलेल्या तालबद्ध सादरीकरणाने उपस्थितांची दाद मिळवली. न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने रामभक्तांची मने जिंकली.
कार्यक्रमाची सांगता राम मंदिरात माता-भगिनींच्या हस्ते सामूहिक महाआरतीने करण्यात आली. संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

BIG BREKING NEWS गर्भलिंग निदान प्रकरणात SIT ची मोठी कारवाई ; मुख्य आरोपी आण्णा...

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (ता.०९) केडगाव ता. दौंड येथील बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणात यवत पोलीस ठाण्याच्या विशेष तपास पथकाने (SIT) तपासाची व्याप्ती वाढवत मोठी कारवाई...

‘मावशी, साप आला!’ म्हणत वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने हिसकावले यवत पोलिसांनी सराईत आरोपीला जेरबंद...

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८) शेतात काम करून झाडाजवळ बसलेल्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेला ‘मावशी, साप आला!’ असे सांगून घाबरवून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने...

यवत–भांडगाव–खुंटबाव परिसरात मटका व्यवसायाला ऊत; कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

दौंड संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८) यवत, भांडगाव आणि खुंटबाव परिसरात मटका व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. परिसरातील विविध ठिकाणी...

बोरीएंदीच्या निखिल दीक्षितची AI मध्ये भरारी

यवत संघर्ष नायक प्रतिनिधी दि . ३०  दौंड तालुक्यातील बोरीएंदी येथील सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या निखिल देविदास दीक्षित यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत फिल्म मेकिंग,...

खासदार सुप्रिया सुळे यांची पिंपळगाव येथील गिरीष ऍग्रो फूड्सला भेट….नातू बंधुचे केले कौतुक…

संघर्षनायक पारगाव (दि.३०)  खासदार सुप्रिया सुळे यांनी (दि.३०) रोजी दौंड तालुक्याच्या दौऱ्यात विविध ठिकाणी भेटी देत नागरिक, कार्यकर्ते व विविध संस्थांशी संवाद साधला. ‘आपला मतदारसंघ,...

error: Content is protected !!