Homeताज्या बातम्यायवत येथे 'महाराजस्व समाधान शिबिर' संपन्न,३५० लाभार्थ्यांना लाभ, उपस्थित नागरिकांची आरोग्य तपासणी

यवत येथे ‘महाराजस्व समाधान शिबिर’ संपन्न,३५० लाभार्थ्यांना लाभ, उपस्थित नागरिकांची आरोग्य तपासणी

यवत येथे ‘महाराजस्व समाधान शिबिर’ संपन्न,३५० लाभार्थ्यांना लाभ, उपस्थित नागरिकांची आरोग्य तपासणी

संघर्ष नायक वृत्तसेवा (ता.०७)
यवत ता.दौंड येथे दि.०७ रोजी महसूल विभागाकडून महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यांमध्ये शासनाकडून शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, जेष्ठ नागरिक महिला, विद्यार्थी यांच्या अनेक शासकीय कामे एकाच छताखाली देण्यात आल्या.
यावेळी उपविभागीय अधिकारी रेवणनाथ लबडे, तहसीलदार अरुण शेलार , यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख , तालुका आरोग्य अधिकारी उज्वला जाधव  नायब तहसीलदार तुषार बोरकर , पुरवठा निरीक्षन अधिकारी निमजे व इतर अधिकारी, कर्मचारी तसेच नवनिर्वाचित जि प सदस्य अविनाश कुदळे राहू खामगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य सागर शेलार खामगाव गणाचे पंचायत समिती सदस्य सुखदेव चोरमले पडळकर बोरी भडक गाना च्या मस्के त्याचबरोबर ग्रामपंचायत सरपंच व पदाधिकारी, पोलीस पाटील, विविध सामाजिक संघटना प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासनाने ‘प्रशासन लोकांच्या दारी’ या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी दौंड तालुक्यात  ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत विशेष समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.यवत येथील पालखी तळ येथे हे शिबीर संपन्न झाले असल्याची माहिती दौंड महसूल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.                     उपविभागीय अधिकारी कार्यालय दौंड व तहसील कार्यालय दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरामुळे यवत आणि मंडळ परिसरातील अनेक महसूल मंडळातील शेतकरी व ग्रामस्थांना आपल्या विविध कामांसाठी सरकारी कचेऱ्यांचे उंबरठे झिजवण्यापासून व होणाऱ्या हेळसांड पासून मोठा दिलासा मिळाला आहे .

एकाच छताखाली मिळाल्या सेवा……
या शिबिरामध्ये विविध विभागांचे टेबल लावले असून, त्यामध्ये शेतीविषयक शेतकऱ्यांच्या अनेक समस्या दाखले आणि शासकीय योजना आशा सेवांचा लाभ नागरिकांना झाला.

महसूली नोंदी…
प्रलंबित फेरफार नोंदी, सातबारा उताऱ्यामधील नावांच्या चुकांची दुरुस्ती, जिवंत सातबारा, डिजिटल सातबारा आणि ८-अ उताऱ्यांचे थेट वाटप. तसेच तुकडे बंदी नियमितीकरण आणि वर्ग-२ जमिनींचे वर्ग-१ मध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रिया आशा अनेक बाबींचा यामध्ये समावेश करण्यात आला होता.

शैक्षणिक दाखले व प्रमाणपत्र व शासकीय कागदपत्रे…
लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत आवश्यक असणारे जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर, उत्पन्न दाखला, रहिवास व अधिवास (डोमिसाईल) प्रमाणपत्रांचे संकलन व वाटप केले जाईल.

योजना…..
संजय गांधी निराधार योजना आणि इंदिरा गांधी पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांचे अर्ज यांचा तात्काळ निपटारा केला असून लाभार्थी यांना त्यांचे वाटप केले.

एक खिडकी योजना….
शेतीशी संबंधित अत्यंत महत्त्वाची अग्रीस्टॅक नोंदणी, पीएम किसान नवीन नोंदणी आणि प्रलंबित ई-केवायसी ची कामे या शिबिरात पूर्ण केली.

शेतकऱ्यांच्या समस्यांना प्राधान्यः
भूसंपादन आणि अकृषिक जमिनींच्या संदर्भातील ‘कमी-जास्त पत्रक’ तयार करणे, तसेच अकृषिक
तरतुदींनुसार सुधारित अधिमूल्य वसूल करून प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यामुळे परिसरातील शेतकरी वर्गाचा वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होणार आहे.

प्रशासकीय आवाहन केल्याने नागरिकांना फायदा…..
यवत आणि पाटस येथील परिसरातील सर्व शेतकरी बांधव, भगिनी आणि तरुणांनी या संधीचा लाभ घेऊन आपली प्रलंबित प्रशासकीय कामे पूर्ण करून घ्यावीत. प्रशासनाचे अधिकारी स्वतः तुमच्या दारी येत असून, या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा,’ “असे आवाहन महसूल विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

BIG BREKING NEWS गर्भलिंग निदान प्रकरणात SIT ची मोठी कारवाई ; मुख्य आरोपी आण्णा...

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (ता.०९) केडगाव ता. दौंड येथील बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणात यवत पोलीस ठाण्याच्या विशेष तपास पथकाने (SIT) तपासाची व्याप्ती वाढवत मोठी कारवाई...

‘मावशी, साप आला!’ म्हणत वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने हिसकावले यवत पोलिसांनी सराईत आरोपीला जेरबंद...

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८) शेतात काम करून झाडाजवळ बसलेल्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेला ‘मावशी, साप आला!’ असे सांगून घाबरवून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने...

यवत–भांडगाव–खुंटबाव परिसरात मटका व्यवसायाला ऊत; कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

दौंड संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८) यवत, भांडगाव आणि खुंटबाव परिसरात मटका व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. परिसरातील विविध ठिकाणी...

बोरीएंदीच्या निखिल दीक्षितची AI मध्ये भरारी

यवत संघर्ष नायक प्रतिनिधी दि . ३०  दौंड तालुक्यातील बोरीएंदी येथील सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या निखिल देविदास दीक्षित यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत फिल्म मेकिंग,...

खासदार सुप्रिया सुळे यांची पिंपळगाव येथील गिरीष ऍग्रो फूड्सला भेट….नातू बंधुचे केले कौतुक…

संघर्षनायक पारगाव (दि.३०)  खासदार सुप्रिया सुळे यांनी (दि.३०) रोजी दौंड तालुक्याच्या दौऱ्यात विविध ठिकाणी भेटी देत नागरिक, कार्यकर्ते व विविध संस्थांशी संवाद साधला. ‘आपला मतदारसंघ,...

error: Content is protected !!