राहू संघर्ष नायक वृत्तसेवा.(ता.१४)
ग्रामीण भागातील ज़िल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान अवगत व्हावे.दैनंदिन जीवनात व्यवहार कसे करतात, प्रतक्षपणे वस्तूंची देवाण – घेवाण कसे व्यवहार पूर्ण केले जातात,रोख रक्कमेचे व्यवहार,ऑनलाईन व्यवहार म्हणजे काय,ते कसे केले जातात याची चिमुकल्या विद्यार्थ्यांना सखोल माहिती व ज्ञान अवगत व्हावे यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि शालेय व्यवस्थापन समिती नाथाचीवाडी यांच्या वतीने नाथाचीवाडी ता.दौंड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळाच्या प्रांगणात बाल आनंद मेळाव्याचे आयोजन (दि.१४) रोजी करण्यात आले होते.बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन खंडाळे व उपाध्यक्ष विकास बर्वे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता कुदळे,सहशिक्षिका वीणा जोशी,आरती सातव,सुजित खेडेकर,अंगणवाडी कार्यकर्त्यांना शालन पंडित मदतनीस प्रियाका चोरमले, यांच्यासह संदिप खेनट,बाळासाहेब इनामके,संदिप गडदे, पंडित बर्वे,इंदुमती बळी यांच्यासह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.

बाल आनंद मेळाव्याचा सर्वात महत्वाचा हेतु म्हणजे विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाबद्दल प्रत्यक्ष अनुभवानी माहिती मिळावी व त्यांनी स्वतः व्यावहारिक ज्ञानाचा अनुभव घ्यावा असे शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता कुदळे यांनी सांगितले.बाल आनंद मेळावा यशस्विरित्या पार पडला.यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्याकडून गावातील नागरिकांनी आणि शालेय विद्यार्थी यांनी मनमोकळे वा सढळ हाताने खरेदी केली. व त्यांनी आणलेल्या खाऊ चं देखील आस्वाद घेतला.शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

या मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः लावलेले खाद्यपदार्थांचे स्टॉल्स भेळ,पाणीपुरी,चटपटीत, वडापाव, भजी इत्यादी खाद्य पदार्थ त्याच बरोबर शेतातील वांगी,मेथी, कोथिंबीर, काकडी, अशी ताजी भाजी देखील विक्रीसाठी होती.विविध घरगुती खाद्यपदार्थांच्या सुगंधाने शालेय परिसर दरवळला होता. व्यवसाय कसा करावा, पैशांचे नियोजन आणि ग्राहकांशी कसे बोलावे,याच बरोबर वजन, मापे, दैनंदिन जीवनातील व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी ऑनलाईन पैसे कसे दिले घेतले जातात याची प्रत्यक्ष शिक्षण विद्यार्थ्यांना या निमित्ताने मिळाले. पालकांनी वा गावातील ग्रामस्थांनी या मेळाव्याला मोठी गर्दी करत शालेय मुलांचे व शिक्षकांचे कौतुक केले.
शिक्षक नवनवीन स्तुत्य उपक्रम राबवतात……
ज़िल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय जीवनात शिक्षणासोबत नवनवीन गोष्टी,कृती,भाषण,स्पर्धा,उपक्रम त्याचबरोबर त्यांचे व्यवहारिक कौशल्य सुधारावे, त्यांना दैनंदिन जीवनात व्यवहार कौशल्य अवगत व्हावे यासाठी शाळेचे सर्व शिक्षक खूप प्रयत्न करतात.
-सचिन खंडाळे (अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती नाथाचीवाडी)
मेळाव्यास ग्रामस्थ व पालकांच उत्स्फूर्त प्रतिसाद…
शाळेतील विद्यार्थी यांनी ताज्या भाजीसह, खाऊंचे, नाश्त्याचे पदार्थ आणले होते.स्टॉल लावण्यात आले होते. शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे लाभले, गावातील गावकरी यांनी देखील चांगल्या प्रकारे या बाल आनंदी मेळाव्यास प्रतिसाद दिला. शालेय व्यवस्थापन समिती आणि सर्व शिक्षक वृंद यांचे आभार.
–संदिप गडदे (सामाजिक कार्यकर्ते)

मुख्य संपादक:
























