Homeताज्या बातम्याइंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा घवघवीत यशाचा धडाका

इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा घवघवीत यशाचा धडाका

संघर्ष नायक वृत्तसेवा पारगाव (ता.१०) :

पारगाव ता. दौंड येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक (एच.एस.सी.) व माध्यमिक (एस.एस.सी.) परीक्षांमध्ये उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. गुणवत्तेच्या बाबतीत विद्यालयाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

बारावीच्या निकालात विज्ञान शाखेने १०० टक्के निकालाची नोंद करत सर्वांचे लक्ष वेधले. कला शाखेचा निकाल ७२ टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल ८८.६७ टक्के लागला. विज्ञान शाखेत कु. ज्ञानेश्वरी गोविंद जगदाळे हिने ६९.८३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कला शाखेत कु. श्रुती लक्ष्मण हेकड हिने ६५.८३ टक्के गुणांसह अव्वल स्थान मिळवले. वाणिज्य शाखेत ओंकार संजय वडेकर याने ५८.५० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला.

दहावीच्या (एस.एस.सी.) परीक्षेतही विद्यालयाने ९६.३६ टक्के निकालाची नोंद करत उज्ज्वल यश संपादन केले. कु. समृद्धी राजन चव्हाण हिने ९४.८० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. कु. श्रेया प्रतीक ताकवणे हिने ९२.८० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला, तर कु. जिया जुबेर मुल्ला हिने ८९.८० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.याशिवाय, इयत्ता आठवीतील कु. संस्कृती संदीप नारगे हिने एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवत विद्यालयाच्या यशात आणखी भर घातली आहे.

विद्यालयाचे प्राचार्य श्री. कृष्णा जगदाळे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत, विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचे सहकार्य यामुळेच हा उल्लेखनीय निकाल शक्य झाल्याचे सांगितले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळा समिती, व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी संघ तसेच ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करून सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

BIG BREKING NEWS गर्भलिंग निदान प्रकरणात SIT ची मोठी कारवाई ; मुख्य आरोपी आण्णा...

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (ता.०९) केडगाव ता. दौंड येथील बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणात यवत पोलीस ठाण्याच्या विशेष तपास पथकाने (SIT) तपासाची व्याप्ती वाढवत मोठी कारवाई...

‘मावशी, साप आला!’ म्हणत वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने हिसकावले यवत पोलिसांनी सराईत आरोपीला जेरबंद...

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८) शेतात काम करून झाडाजवळ बसलेल्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेला ‘मावशी, साप आला!’ असे सांगून घाबरवून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने...

यवत–भांडगाव–खुंटबाव परिसरात मटका व्यवसायाला ऊत; कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

दौंड संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८) यवत, भांडगाव आणि खुंटबाव परिसरात मटका व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. परिसरातील विविध ठिकाणी...

बोरीएंदीच्या निखिल दीक्षितची AI मध्ये भरारी

यवत संघर्ष नायक प्रतिनिधी दि . ३०  दौंड तालुक्यातील बोरीएंदी येथील सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या निखिल देविदास दीक्षित यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत फिल्म मेकिंग,...

खासदार सुप्रिया सुळे यांची पिंपळगाव येथील गिरीष ऍग्रो फूड्सला भेट….नातू बंधुचे केले कौतुक…

संघर्षनायक पारगाव (दि.३०)  खासदार सुप्रिया सुळे यांनी (दि.३०) रोजी दौंड तालुक्याच्या दौऱ्यात विविध ठिकाणी भेटी देत नागरिक, कार्यकर्ते व विविध संस्थांशी संवाद साधला. ‘आपला मतदारसंघ,...

error: Content is protected !!