संघर्ष नायक वृत्तसेवा केडगाव ता..०१
दौंड तालुक्यातील बोरिपारधी केडगाव येथील कॅन्सर स्पेशल निरामय हॉस्पिटलचे संचालक डॉ.विशाल खळदकर आणि नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य तथा आरोग्य समितीच्या सदस्या डॉ.गायत्री खळदकर यांनी दि. ३० रोजी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेत विविध लोकहिताच्या विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले.
या भेटीदरम्यान शिरूर–सातारा राष्ट्रीय महामार्गावरील पारगाव परिसरात, राष्ट्रीय महामार्ग NH-548 अंतर्गत वाढत्या वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर 100 खाटांचे अत्याधुनिक ट्रॉमा सेंटर उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. अपघातग्रस्तांना सुवर्णक्षणात (Golden Hour) उपचार मिळावेत आणि परिसरातील नागरिकांना दर्जेदार आपत्कालीन आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा प्रस्ताव मांडण्यात आल्याचे जिल्हा परिषद सदस्य तथा आरोग्य समितीच्या सदस्या डॉ.गायत्री खळदकर यांच्याकडून सांगण्यात आले.
याचबरोबर नानंगाव आणि वडगाव रासाई दरम्यान कोल्हापूर पद्धतीचा बुडीत बंधारा उभारण्याबाबतही मागणी करण्यात आली.या प्रस्तावाची दखल घेत संबंधित विभागामार्फत आवश्यक सरकारी सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
तसेच नानंगाव गणेश रोड ते वडगाव रासाई या दरम्यान आणखी एक नवीन बुडीत बंधारा उभारण्यासाठी राज्य शासन अथवा जिल्हा नियोजन व विकास समिती (DPDC) यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून काम मंजूर करण्याची विनंती करण्यात आली. या प्रकल्पामुळे जलसंधारणाला चालना मिळण्याबरोबरच भूजल पातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
आरोग्य सुविधा आणि जलसंधारण या दोन्ही क्षेत्रांतील महत्त्वाच्या मागण्यांवर झालेल्या या चर्चेला राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले.संबंधित प्रस्तावांवर शासन स्तरावर आवश्यक कार्यवाही करण्याबाबत अनुकूल भूमिका व्यक्त करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.

मुख्य संपादक:
























