Homeताज्या बातम्यायवत येथे आमदार राहुल कुल विचारमंचच्या तरुणांकडून वारकऱ्यांची सेवा; अल्पोपहार व जीवनावश्यक...

यवत येथे आमदार राहुल कुल विचारमंचच्या तरुणांकडून वारकऱ्यांची सेवा; अल्पोपहार व जीवनावश्यक साहित्याचे वाटप…नाश्ता, चहा, पिण्याचे पाणी, साबण आदींचे वितरण; सेवाभावातून जपली वारकरी परंपरा

संघर्ष नायक वृत्तसेवा यवत (ता.१४)

आषाढी वारीनिमित्त संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या हजारो वारकऱ्यांच्या सेवेसाठी यवत येथे आमदार राहुल कुल विचारमंचच्या तरुणांनी सेवाभावी उपक्रम राबविला. वारकऱ्यांना नाश्ता, चहा, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, साबण तसेच अन्य आवश्यक वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले.

पालखी सोहळ्यानिमित्त यवतमध्ये मोठ्या संख्येने वारकरी दाखल झाले होते. उन्हाचा तडाखा आणि प्रवासाचा थकवा लक्षात घेऊन विचारमंचच्या कार्यकर्त्यांनी वारकऱ्यांच्या सोयीसाठी अल्पोपहार केंद्र उभारले. येथे वारकऱ्यांना प्रेमाने नाश्ता व गरम चहा देण्यात आला. तसेच पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, साबण आणि अन्य आवश्यक साहित्याचेही वितरण करण्यात आले.

या सेवाभावी उपक्रमाला वारकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तरुणांच्या कार्याचे कौतुक केले. वारकरी संप्रदायाची सेवा हीच विठ्ठलाची सेवा मानून अनेक युवकांनी या उपक्रमात स्वयंप्रेरणेने सहभाग घेतला. संपूर्ण उपक्रम शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला.

यावेळी आमदार राहुल कुल विचारमंचचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अनेक युवक उपस्थित राहून वारकऱ्यांच्या सेवेत सहभागी झाले. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरात स्वागत करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शालेय अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडछाड प्रकरणी दोन युवकांवर पोस्को अंतर्गत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल….न्यायालयीन...

पारगाव,संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.२९) शिक्षणासाठी घराबाहेर पडणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना पारगाव परिसरात घडली आहे.पारगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते

पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या (झेडपी) इमारतीत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्या पदाधिकाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने मोठे नाट्य...

भारतीय शास्त्रज्ञांना मलेरिया थांबवण्याचा मार्ग सापडला असेल

नवी दिल्लीतील रस्त्यावर साचलेले पाणी. भारतामध्ये 2015 पासून मलेरियाच्या प्रकरणांमध्ये अंदाजे 80-87% घट नोंदवली गेली आहे. लडाख, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीसह अनेक प्रदेशांमध्ये अलीकडच्या...

पाऊस आणण्यासाठी सक्रिय मान्सून, सोसाट्याचा वारा महा | पुणे बातम्या

रविवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24 तासांत कुरवंडे येथे सर्वाधिक 123 मिमी, लव्हाळे येथे 60 मिमी आणि भोर येथे 50 मिमी पावसाची नोंद...

error: Content is protected !!