Homeक्राईमशालेय अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडछाड प्रकरणी दोन युवकांवर पोस्को अंतर्गत यवत पोलीस ठाण्यात...

शालेय अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडछाड प्रकरणी दोन युवकांवर पोस्को अंतर्गत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल….न्यायालयीन कोठडीत रवानगी….

पारगाव,संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.२९)

शिक्षणासाठी घराबाहेर पडणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना पारगाव परिसरात घडली आहे.पारगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या पारगाव येथील अल्पवयीन विद्यार्थिनींची भररस्त्यात छेडछाड केल्याप्रकरणी दौंड तालुक्यातील खुटबाव येथील प्रमोद ऊर्फ प्रवीण गणपत थोरात आणि दिनेश दत्तात्रय पासलकर या दोघांविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवार दि.२८ रोजी सायं ५ वाजता शाळा सुटल्यानंतर पारगाव फाटा येथे घरी जाण्यासाठी थांबलेल्या शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनींसमोर आरोपी चारचाकी वाहनातून आले आणि त्यांनी असभ्य वर्तन करत मुलींना त्रास दिल्याचा आरोप आहे.या प्रकारामुळे विद्यार्थिनी प्रचंड घाबरल्या.त्यांनी तत्काळ जवळील युवकांना माहिती दिल्यानंतर संतप्त युवकांनी आरोपींचा तब्बल २५ किलोमीटर पाठलाग केला. मात्र, आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले.

न्यू इंग्लिश स्कूल पारगाव व्यवस्थापन समिती अध्यक्ष वैभव बोत्रे यांनी तात्काळ उपस्थित राहून माहिती घेतली आणि संबंधित विद्यार्थिनींच्या कुटुंबियांना धीर दिला.सदर मुलीच्या कुटुंबियांनी यवत पोलीस ठाणे अंकित केडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक (PSI) किशोर वागज यांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना व या गुन्ह्यात वापरण्यात आलेली चार चाकी युको गाडी क्र. (एम.एच ४२.बी.एस 8535) जप्त करून आरोपीना अटक केली.

आज दि. २९ रोजी बारामती सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक (PSI) किशोर वागज करीत आहेत.

शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शाळा परिसर व बसथांब्यांवर पोलिसांची गस्त वाढविणे, तसेच अशा विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर आणि जलद कारवाई करण्याची मागणी पालक व नागरिकांकडून जोर धरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते

पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या (झेडपी) इमारतीत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्या पदाधिकाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने मोठे नाट्य...

भारतीय शास्त्रज्ञांना मलेरिया थांबवण्याचा मार्ग सापडला असेल

नवी दिल्लीतील रस्त्यावर साचलेले पाणी. भारतामध्ये 2015 पासून मलेरियाच्या प्रकरणांमध्ये अंदाजे 80-87% घट नोंदवली गेली आहे. लडाख, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीसह अनेक प्रदेशांमध्ये अलीकडच्या...

पाऊस आणण्यासाठी सक्रिय मान्सून, सोसाट्याचा वारा महा | पुणे बातम्या

रविवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24 तासांत कुरवंडे येथे सर्वाधिक 123 मिमी, लव्हाळे येथे 60 मिमी आणि भोर येथे 50 मिमी पावसाची नोंद...

प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल पुण्यात तरुण मंडळांनी आनंदोत्सव साजरा केला पुणे बातम्या

पुणे : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर शनिवारी शहरात अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला. SPPU टीचर्स असोसिएशनने शनिवारी देशभरातील आंदोलक विद्यार्थ्यांवर...

error: Content is protected !!