Homeक्राईमपाटस चौकी हद्दीत अवैध गावठी पिस्तूल बाळगणारा जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडक...

पाटस चौकी हद्दीत अवैध गावठी पिस्तूल बाळगणारा जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई …यवत पोलीस ठाणे हद्दीतील चांगुना हॉटेलसमोर सापळा रचून अटक; पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

संघर्ष नायक वृत्तसेवा यवत ता. १०

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने यवत पोलीस ठाणे हद्दीतील पाटस चौकी परिसरात धडक कारवाई करत अवैधरित्या गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका आरोपीला अटक केली. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस असा एकूण १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवत पोलीस ठाणे हद्दीत नियमित गस्त घालत असताना पोलीस हवालदार गुरुनाथ गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार, सनी कुमार केसरी प्रसाद (रा. डोमणीमऊ, मोहम्मदपूर नोगवाँ, इलाहाबाद, उत्तर प्रदेश) हा पाटस येथील चांगुना हॉटेलसमोर गावठी पिस्तूल घेऊन उभा असल्याची माहिती मिळाली.

माहितीची खातरजमा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी सापळा रचला. संशयितास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी तात्काळ शस्त्र जप्त करून आरोपीला अटक केली.

याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये कलम ३ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन घाडगे, असिफ शेख, पोलीस हवालदार गुरुनाथ गायकवाड, सुभाष राऊत, योगेश नागरगोजे आणि विकास कापरे यांनी पार पाडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

BIG BREKING NEWS गर्भलिंग निदान प्रकरणात SIT ची मोठी कारवाई ; मुख्य आरोपी आण्णा...

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (ता.०९) केडगाव ता. दौंड येथील बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणात यवत पोलीस ठाण्याच्या विशेष तपास पथकाने (SIT) तपासाची व्याप्ती वाढवत मोठी कारवाई...

‘मावशी, साप आला!’ म्हणत वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने हिसकावले यवत पोलिसांनी सराईत आरोपीला जेरबंद...

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८) शेतात काम करून झाडाजवळ बसलेल्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेला ‘मावशी, साप आला!’ असे सांगून घाबरवून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने...

यवत–भांडगाव–खुंटबाव परिसरात मटका व्यवसायाला ऊत; कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

दौंड संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८) यवत, भांडगाव आणि खुंटबाव परिसरात मटका व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. परिसरातील विविध ठिकाणी...

बोरीएंदीच्या निखिल दीक्षितची AI मध्ये भरारी

यवत संघर्ष नायक प्रतिनिधी दि . ३०  दौंड तालुक्यातील बोरीएंदी येथील सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या निखिल देविदास दीक्षित यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत फिल्म मेकिंग,...

खासदार सुप्रिया सुळे यांची पिंपळगाव येथील गिरीष ऍग्रो फूड्सला भेट….नातू बंधुचे केले कौतुक…

संघर्षनायक पारगाव (दि.३०)  खासदार सुप्रिया सुळे यांनी (दि.३०) रोजी दौंड तालुक्याच्या दौऱ्यात विविध ठिकाणी भेटी देत नागरिक, कार्यकर्ते व विविध संस्थांशी संवाद साधला. ‘आपला मतदारसंघ,...

error: Content is protected !!