Homeक्राईममित्रांच्या मदतीने पुतण्याने केली चुलत्याची तीन लाखांची चोरी..... इंदापूर पोलिसांनी आरोपीना ठोकल्या...

मित्रांच्या मदतीने पुतण्याने केली चुलत्याची तीन लाखांची चोरी….. इंदापूर पोलिसांनी आरोपीना ठोकल्या बेड्या….

संघर्ष नायक वृत्तसेवा इंदापूर ता.१६

इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथे (दि.5) मार्च रोजी चोरीची घटना घडली होती. पुतण्यानेच चुलत्याचे घरातून चोरी करुन पळ काढला होता. याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याट चोरीला गेलेल्या सोन्याचे दागिने व रोकड असा तीन लाख एकोणीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत तिघांना इंदापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

याप्रकरणी चोरी प्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात स्वप्नाली कृष्णा पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल कारण्यात आळा होता.या दाखल असलेल्या गुन्ह्यात चोरट्यांनी दोन लाख चौऱ्यांशी हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि पंचेचाळीस हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरी केली होती.या घटनेचे गांभीर्य ओळखून इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत असताना पो. हवालदार विनोद रासकर आणि त्यांच्या पथकाला तांत्रिक विश्लेषणाद्वारे व गोपनीय खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून फिर्यादी यांचा सख्खा पुतण्या महेश ज्ञानदेव पवार (वय १९ वर्ष रा. वडापुरी, ता. इंदापूर) <span;>यास ताब्यात घेवून त्याचेकडे कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा कबूल केला असून गुन्हयातील चोरी केलेला सोन्याच्या दागीन्यांची त्याचे साथीदार श्रीशैल्य उर्फ शंभु आनंद देशमुख (वय २४ वर्षे मुळ, रा. संग्रामनगर अकलुज ता. माळशिरस, जि. सोलापुर, सध्या रा. माळवाडी न.२ ता.इंदापूर) व सुनिल चंद्रकांत रणखांबे (वय २६ वर्षे, रा. पंचायत समिती कॉलनी, इंदापुर) यांचे मदतीने कर्नाटक राज्यातील इंडी येथे विक्री केल्याचे कबुल केले.        गुन्हयातील सोन्याचे दागीने इंदापूर पोलीसांनी इंडी, राज्य कर्नाटक येथे जावुन हस्तगत केले.
सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राऊत, पोलीस उपनिरीक्षक अजित बिरादार,पो.हवा.विनोद रासकर,शिंदे,पो.कॉ. अंकुश माने,सागर क्षीरसागर,हसीम मुलानी,मोहन आनंदगावकर,सौरभ पाटील यांच्या पथकाने केली असून पुढील अधिक तपास पोलीस हवालदार विनोद रासकर करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

BIG BREKING NEWS गर्भलिंग निदान प्रकरणात SIT ची मोठी कारवाई ; मुख्य आरोपी आण्णा...

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (ता.०९) केडगाव ता. दौंड येथील बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणात यवत पोलीस ठाण्याच्या विशेष तपास पथकाने (SIT) तपासाची व्याप्ती वाढवत मोठी कारवाई...

‘मावशी, साप आला!’ म्हणत वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने हिसकावले यवत पोलिसांनी सराईत आरोपीला जेरबंद...

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८) शेतात काम करून झाडाजवळ बसलेल्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेला ‘मावशी, साप आला!’ असे सांगून घाबरवून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने...

यवत–भांडगाव–खुंटबाव परिसरात मटका व्यवसायाला ऊत; कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

दौंड संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८) यवत, भांडगाव आणि खुंटबाव परिसरात मटका व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. परिसरातील विविध ठिकाणी...

बोरीएंदीच्या निखिल दीक्षितची AI मध्ये भरारी

यवत संघर्ष नायक प्रतिनिधी दि . ३०  दौंड तालुक्यातील बोरीएंदी येथील सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या निखिल देविदास दीक्षित यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत फिल्म मेकिंग,...

खासदार सुप्रिया सुळे यांची पिंपळगाव येथील गिरीष ऍग्रो फूड्सला भेट….नातू बंधुचे केले कौतुक…

संघर्षनायक पारगाव (दि.३०)  खासदार सुप्रिया सुळे यांनी (दि.३०) रोजी दौंड तालुक्याच्या दौऱ्यात विविध ठिकाणी भेटी देत नागरिक, कार्यकर्ते व विविध संस्थांशी संवाद साधला. ‘आपला मतदारसंघ,...

error: Content is protected !!