संघर्ष नायक वृत्तसेवा यवत ता. १६
यवत ता.दौंड येथे मागील काही दिवसापासून घरफोडीच्या घटनामध्ये वाढ झाली होती.या घरफोडीचा यवत पोलिसांनी उलगडा केला आहे. या कारवाईत घरफोडीचे एकूण १० गुन्हे उघडकीस आले असून दोन मोक्का गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या सराईत आरोपीसह तिघांना अटक करण्यात यवत पोलीसांना मोठे यश आले आहे.यामध्ये रकुल उर्फ अमर दशरथ चव्हाण (वय ३१, रा. न्हावरा ता. शिरूर) आणि त्यांचे साथीदार महेश संभाजी भोसले (वय २२ वर्षे) रा.गुंडेगाव,ता.जि.अहिल्यानगर व अमोल शास्त्री भोसले (वय २० वर्षे रा.न्हावरा ता.शिरूर) अशी जेरबंद करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.
याबाबत यवत पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की,परिसरात झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासा दरम्यान यवत पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने तांत्रिक विश्लेषनाच्या मदतीने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली व त्याचबरोबर खबऱ्या मार्फत मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस हवालदार गुरुनाथ गायकवाड, विकास कापरे यांना संशयित आरोपींबाबत माहिती मिळाल्यानंतर यवत पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरित्या सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले.
साथीदारांसह घरफोडी केल्याची कबुली वरील आरोपीनी दिली असून यवत परिसरात मोठ्या प्रमाणात झालेल्या घरफोडीमध्ये आरोपीना जेरबंद करण्यात मोठे यश आले आहे. यामधील रकुल उर्फ अमर दशरथ चव्हाण (वय ३१, रा. न्हावरा ता. शिरूर) हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात घरफोडी,चोरी, दरोडा, जबरी चोरी व हत्यार बाळगळेचे असे एकूण १० गँभीर गुन्हे असून तो मोका सारख्या गुन्ह्यात देखील दोन वर्ष फरार असल्याने यवत पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने त्याला मोठ्या शिताफिने जेरबंद केल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदरची कारवाई ही संदीपसिंह गिल पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, गणेश बिरादार अपर पोलीस अधिक्षक बारामती, बापुराव दडस उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सपोनि महेश माने, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कुलदीप संपकाळ,पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज, पो.हवा गुरूनाथ गायकवाड,संदीप देवकर,अक्षय यादव,महेंद्र चांदणे,रामदास जगताप,विकास कापरे,दत्ता काळे, मारूती बाराते, पो.कॉन्स्टेबल अमोल भुजबळ,प्रतिक धिवार,सुधीर सोनवणे,विनीत कु-हाडे,मोहन भानवसे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे सफौ सचिन घाडगे,असिफ शेख,अजित भुजबळ,जनार्धन शेळके,संजय जाधव, योगेश नागरगोजे यांचे पथकाने केली आहे.

मुख्य संपादक:
























