Homeताज्या बातम्यालोकवर्गणीतून नानगावची वैकुंठ रथाची गरज पूर्ण

लोकवर्गणीतून नानगावची वैकुंठ रथाची गरज पूर्ण

पारगाव संघर्ष नायक वृत्तसेवा ता.०८

दौंड तालुक्यातील नानगाव येथे ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या वैकुंठ रथाच्या पूजन सोहळ्याला गुरुवारी (दि. ७) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गावातील अंत्यसंस्कार व्यवस्थेसाठी आवश्यक असलेल्या वाहनाची कमतरता लक्षात घेऊन ग्रामस्थांनी एकजुटीने पुढाकार घेत हा समाजोपयोगी उपक्रम साकारला.

गावातील वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांना रात्री-अपरात्री भीमा नदीलगत असलेल्या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी जाण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मृतदेह वाहतुकीसाठी योग्य वाहन उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांची अनेकदा गैरसोय होत होती. ही समस्या कायमची दूर करण्यासाठी ग्रामस्थांनी लोकवर्गणी उभारण्याचा निर्णय घेतला.

गावातील दानशूर नागरिकांच्या सहकार्याने तब्बल ३ लाख ४० हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली. या निधीतून सुसज्ज आणि आकर्षक वैकुंठ रथ तयार करण्यात आला असून, आता गावकऱ्यांची मोठी सोय झाली आहे. या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले असून, सर्व स्तरांतून या संकल्पनेचे कौतुक होत आहे.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सुदाम खळदकर, सी. बी. खळदकर, विश्वास भोसले, दादासो खळदकर, प्रल्हाद रासकर आणि दीपक पवार यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नांमुळे नानगावमध्ये एक आदर्श उपक्रम उभा राहिला आहे.

दरम्यान, या आकर्षक वैकुंठ रथाची निर्मिती अहिल्यानगर येथील बेलवंडी फाटा परिसरातील प्रसिद्ध कारागीर टिळेकर बंधूंनी केली आहे. नानगावच्या या उपक्रमातून तालुक्यातील इतर गावांनाही प्रेरणा मिळणार असून, अशा प्रकारची संकल्पना ग्रामीण भागात अधिक व्यापक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

BIG BREKING NEWS गर्भलिंग निदान प्रकरणात SIT ची मोठी कारवाई ; मुख्य आरोपी आण्णा...

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (ता.०९) केडगाव ता. दौंड येथील बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणात यवत पोलीस ठाण्याच्या विशेष तपास पथकाने (SIT) तपासाची व्याप्ती वाढवत मोठी कारवाई...

‘मावशी, साप आला!’ म्हणत वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने हिसकावले यवत पोलिसांनी सराईत आरोपीला जेरबंद...

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८) शेतात काम करून झाडाजवळ बसलेल्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेला ‘मावशी, साप आला!’ असे सांगून घाबरवून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने...

यवत–भांडगाव–खुंटबाव परिसरात मटका व्यवसायाला ऊत; कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

दौंड संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८) यवत, भांडगाव आणि खुंटबाव परिसरात मटका व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. परिसरातील विविध ठिकाणी...

बोरीएंदीच्या निखिल दीक्षितची AI मध्ये भरारी

यवत संघर्ष नायक प्रतिनिधी दि . ३०  दौंड तालुक्यातील बोरीएंदी येथील सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या निखिल देविदास दीक्षित यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत फिल्म मेकिंग,...

खासदार सुप्रिया सुळे यांची पिंपळगाव येथील गिरीष ऍग्रो फूड्सला भेट….नातू बंधुचे केले कौतुक…

संघर्षनायक पारगाव (दि.३०)  खासदार सुप्रिया सुळे यांनी (दि.३०) रोजी दौंड तालुक्याच्या दौऱ्यात विविध ठिकाणी भेटी देत नागरिक, कार्यकर्ते व विविध संस्थांशी संवाद साधला. ‘आपला मतदारसंघ,...

error: Content is protected !!