Homeताज्या बातम्यावीज पडून गाई वासरू आणि बोकड मृत्यूमुखी.... यवत स्टेशनं येथील दुर्दैवी घटना....

वीज पडून गाई वासरू आणि बोकड मृत्यूमुखी…. यवत स्टेशनं येथील दुर्दैवी घटना….

संघर्ष नायक वृत्तसेवा यवत ता.०४
अवकाळी पावसाने दौंड तालुक्यातील काही गावात थैमान घातले आहे.यामध्ये शेतकऱ्यांसह मेंढापाळ यांचेदेखील मोठे नुकसान झाले आहे.मागास असणारा गव्हू,कांदा,द्राक्ष,कलिंगड यांचबरोबर तरकारी पिकांचे नुकसान झाले आहे.त्याच्याबरोबर मेंढापाळ यांच्या पशुधनावर वीज कोसळून गाई वासरू आणि एक बोकड याचा देखील मृत्यू झाला असून मेंढपाळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
दौंड तालुक्यातील यवत येथील स्टेशनं हद्दीत दुधाने चौकात शेतात वस्ती असणाऱ्या मेंढपाळाच्या एक गाई वासरू आणि बोकड यावर वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना (दि.०३) रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.यामध्ये मेंढापाळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.विजेचा प्रभाव एवढ्या तीव्रतेचा होता की मेंढापाळ बाबू आप्पा पिंगळे(रा.भांडगाव ता.दौंड) यांच्या कुटुंबातील चार जण देखील बेशुद्धावास्थेत पडले होते.मात्र सुदैवाने त्यांना काहीही झाले नसून त्यांची प्रकृती ठीक आहे.यामध्ये मात्र त्यांचे पशुधनाचे फार मोठे नुकसान झाले आहे.
या अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे मेंढपाळ आणि शेतकऱ्याचे कंबरडे मोडले असून हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे गेला असल्याने शेतकरी आणि मेंढापाळ हवालदिल झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच ज़िल्हा परिषद सदस्य अविनाश कुदळे,पंचायत समिती सदस्य तेजस्विनी पडळकर ,महसूल विभागाच्या तलाठी मीनाक्षी सोनवणे,पशुवैद्यकीय अधिकारी,यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ पंचनामा करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद सदस्य यांनी मेंढपाळ बाबू पिंगळे यांचे पशुधनाचे झालेल्या नुकसानी बाबत त्यांना धीर देत प्रशासकीय पातळीवर सर्व ती मदत शासकीय विभागाकडून व आमच्याकडून केली जाईल असे आस्वासित केले.

आणि कुटुंब वाचले…..
बाबू पिंगळे दौंड तालुक्यातील भांडगाव येथील मेंढपाळ आहेत.ते दिवसभर आपल्या मेंढ्या जवळपास असणाऱ्या परिसरातील गावातील शेतकरी व जिथे चारा उपलब्ध होईल तिथे ते मेंढ्या चारत अससून आपला उदरनिर्वाह करत असतात मात्र काल पावसामुळे आपल्या मेंढ्या वाड्यावर घेऊन आले असताना अचानक वीज पडल्याने पिंगळे कुटुंबातील चौघे बेशुद्ध पडले होते.वीज गाई वासरू आणि बोकड यांच्यावर पडल्याने त्यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला.मात्र सुदैवाने आम्ही वाचलो अशी थरारक प्रतिक्रिया पिंगळे कुटुंबाने दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

BIG BREKING NEWS गर्भलिंग निदान प्रकरणात SIT ची मोठी कारवाई ; मुख्य आरोपी आण्णा...

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (ता.०९) केडगाव ता. दौंड येथील बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणात यवत पोलीस ठाण्याच्या विशेष तपास पथकाने (SIT) तपासाची व्याप्ती वाढवत मोठी कारवाई...

‘मावशी, साप आला!’ म्हणत वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने हिसकावले यवत पोलिसांनी सराईत आरोपीला जेरबंद...

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८) शेतात काम करून झाडाजवळ बसलेल्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेला ‘मावशी, साप आला!’ असे सांगून घाबरवून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने...

यवत–भांडगाव–खुंटबाव परिसरात मटका व्यवसायाला ऊत; कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

दौंड संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८) यवत, भांडगाव आणि खुंटबाव परिसरात मटका व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. परिसरातील विविध ठिकाणी...

बोरीएंदीच्या निखिल दीक्षितची AI मध्ये भरारी

यवत संघर्ष नायक प्रतिनिधी दि . ३०  दौंड तालुक्यातील बोरीएंदी येथील सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या निखिल देविदास दीक्षित यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत फिल्म मेकिंग,...

खासदार सुप्रिया सुळे यांची पिंपळगाव येथील गिरीष ऍग्रो फूड्सला भेट….नातू बंधुचे केले कौतुक…

संघर्षनायक पारगाव (दि.३०)  खासदार सुप्रिया सुळे यांनी (दि.३०) रोजी दौंड तालुक्याच्या दौऱ्यात विविध ठिकाणी भेटी देत नागरिक, कार्यकर्ते व विविध संस्थांशी संवाद साधला. ‘आपला मतदारसंघ,...

error: Content is protected !!