Homeक्राईमइंदापूर–करमाळा परिसरातील वाळुतस्करावर एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाई... इंदापूर पोलीस स्थानिक गुन्हे शाखा...

इंदापूर–करमाळा परिसरातील वाळुतस्करावर एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाई… इंदापूर पोलीस स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची कारवाई..

संघर्ष नायक वृत्तसेवा इंदापूर ता.१५ :

इंदापूर व करमाळा तालुक्यात अवैधपणे गौणखनिज वाळूचे उत्खनन करून शासनाच्या महसुलाला मोठा फटका देणाऱ्या सराईत वाळुतस्करावर अखेर कठोर कारवाई करण्यात आली आहे. युवा उर्फ विवेक राजेंद्र फलफले (वय ३१,रा.गलांडवाडी नं.१,ता.इंदापूर,जि.पुणे) याला महाराष्ट्र प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत स्थानबद्ध करून नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी मागील पाच वर्षांतील संघटित गुन्हेगारीचा आढावा घेत सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. जामिनावर सुटून पुन्हा गंभीर गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती संकलित करून त्यांच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार दरोडे, लूटमार, खंडणी, खुनाचा प्रयत्न तसेच अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.

इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या विवेक फलफले याच्यावर यापूर्वी सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये संगनमताने मारहाण, चोरी, जलमार्गाने वाळूची चोरी, पर्यावरणाला हानी, सरकारी कामात अडथळा तसेच खुनाचा प्रयत्न अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात आला.

पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी हा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रकरणाचे परीक्षण करून आरोपीस स्थानबद्ध करण्याचा आदेश ७ एप्रिल २०२६ रोजी दिला. आदेशानुसार पोलिसांनी विशेष पथक तयार करून आरोपीचा शोध घेतला व ८ एप्रिल रोजी त्याला ताब्यात घेण्यात आले. पुढे त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण, पोलीस निरीक्षक विलास नाळे, इंदापुर पोलीस स्टेशन,पोलीस उपनिरीक्षक पुंडलीक गावडे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लेंडवे, इंदापुर पोलीस स्टेशन, सहा. पोलीस उपनिरीक्षक महेश बनकर, पो.हवा अभिजीत एकशिंगे, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण, पो हवा सलमान खान, संतोष शिंदे,पोलीस अंमलदार लक्ष्मण सुर्यवंशी,सागर क्षिरसागर यांनी केलेली आहे.

दरम्यान, या कारवाईमुळे इंदापूर व करमाळा परिसरातील अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर मोठा धाक बसला असून, अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवसायांवर भविष्यातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

BIG BREKING NEWS गर्भलिंग निदान प्रकरणात SIT ची मोठी कारवाई ; मुख्य आरोपी आण्णा...

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (ता.०९) केडगाव ता. दौंड येथील बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणात यवत पोलीस ठाण्याच्या विशेष तपास पथकाने (SIT) तपासाची व्याप्ती वाढवत मोठी कारवाई...

‘मावशी, साप आला!’ म्हणत वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने हिसकावले यवत पोलिसांनी सराईत आरोपीला जेरबंद...

यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८) शेतात काम करून झाडाजवळ बसलेल्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेला ‘मावशी, साप आला!’ असे सांगून घाबरवून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने...

यवत–भांडगाव–खुंटबाव परिसरात मटका व्यवसायाला ऊत; कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

दौंड संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८) यवत, भांडगाव आणि खुंटबाव परिसरात मटका व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. परिसरातील विविध ठिकाणी...

बोरीएंदीच्या निखिल दीक्षितची AI मध्ये भरारी

यवत संघर्ष नायक प्रतिनिधी दि . ३०  दौंड तालुक्यातील बोरीएंदी येथील सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या निखिल देविदास दीक्षित यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत फिल्म मेकिंग,...

खासदार सुप्रिया सुळे यांची पिंपळगाव येथील गिरीष ऍग्रो फूड्सला भेट….नातू बंधुचे केले कौतुक…

संघर्षनायक पारगाव (दि.३०)  खासदार सुप्रिया सुळे यांनी (दि.३०) रोजी दौंड तालुक्याच्या दौऱ्यात विविध ठिकाणी भेटी देत नागरिक, कार्यकर्ते व विविध संस्थांशी संवाद साधला. ‘आपला मतदारसंघ,...

error: Content is protected !!